HDFC Bank : HDFC मध्ये खाते आहे का? तर सावध व्हा ; नाहीतर एका क्लीकवर होणार लाखोंच नुकसान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

HDFC Bank : आपल्या देशात सध्या सायबर फ्रॉडशी संबंधित अनेक प्रकरणे दररोज घडत आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या देशात 2021 मध्ये भारतात ऑनलाइन बँकिंग फसवणुकीशी संबंधित 4.8 हजारांहून अधिक प्रकरणे समोर आली आहेत अशी माहिती Statistica च्या अहवालात देण्यात आली आहे.

तुम्हाला हे माहिती असेलच कि आज फसवणूक करणारे दररोज नवीन नवीन मार्गाने लोकांची फसवणूक करत आहे. अशाच एक मार्ग म्हणजे फिशिंग एसएमएसचा आहे. आम्ही तुम्हाला सांगतो फसवणूक करणारा यामध्ये एसएमएसद्वारे लोकांची फसवणूक करतो . लोकांना फोनवर त्यांचे बँक खाते तपशील किंवा KYC किंवा PAN अपडेट करण्यास सांगणारा एसएमएस येतो किंवा त्याच एसएमएसमध्ये एक लिंक दिली जाते. या लिंकवर क्लिक करून बँक खात्यातून पैसे काढता येतात. या लिंकवर क्लिक केल्यावर त्यांना तुमच्या फोनवर एक्सेस मिळतो आणि बँक खाती रिकामी केली जातात. त्यामुळे पीडितांना त्यांचे सर्व पैसे गमवावे लागतात.

ट्विटरवरील एका वापरकर्त्याने ट्विट शेअर केले ज्यामध्ये त्याला एसएमएसद्वारे त्याचे केवायसी अपडेट करण्यास सांगितले होते. मेसेज काहीसा असा होता – “Dear customer your HDFC account will be hold today please update your KYC immediately click here”.

या ट्विटला उत्तर देताना एचडीएफसी बँकेने म्हटले आहे की, कोणत्याही वापरकर्त्याने अशा कोणत्याही मेसेजलावर कधीही क्लिक करू नये. पॅन कार्ड किंवा केवायसी किंवा कोणत्याही प्रकारची बँकिंग माहिती विचारणाऱ्या अशा मेसेजलाही उत्तर देऊ नका. HDFC बँक नेहमी त्यांच्या अधिकृत ID वरून मेसेजला पाठवेल. त्याच ट्विटमध्ये एचडीएफसी बँकेने पुढे लिहिले की बँक तुम्हाला कधीही बँकिंग तपशील, ओटीपी, यूपीआय पिन, ग्राहक आयडी, पासवर्ड, एटीएम कार्ड, सीव्हीव्ही इत्यादी विचारत नाही.

एसएमएस फिशिंग लिंक कशी टाळायची

सर्वप्रथम OTP, बँक तपशील, मोबाईल नंबर किंवा कोणत्याही प्रकारची माहिती एसएमएसवर शेअर करू नका.

UPI साठी नेहमी मजबूत पासवर्ड ठेवा.

इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल फोन देखील पासवर्ड संरक्षित ठेवा आणि वेळोवेळी पासवर्ड बदलत रहा.

असा कोणताही एसएमएस बँक व्यवस्थापकाला कळवा.

ऑनलाइन बँकिंगसाठी टू-फैक्टर ऑथेंटिकेशन एनेबल करा.

यासह, जेव्हा जेव्हा कोणी खाते ऍक्सेस करेल तेव्हा त्याला पासवर्ड किंवा ओटीपी देखील प्रविष्ट करावा लागेल.

तुम्ही तुमचे बायोमेट्रिक्स जसे की फिंगरप्रिंट आणि दुसरा पासवर्ड सेव्ह करू शकता.

जर तुम्हाला फिशिंग एसएमएस आला आणि त्यात लिंक दिसली तर त्यावर क्लिक करू नका.

हे पण वाचा :- Redmi Smart TV Offers : पैसे वसूल ऑफर ! अर्ध्यापेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करा ‘हा’ भन्नाट स्मार्ट टीव्ही ; अशी करा ऑर्डर