Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

PMMVY News : मोदी सरकार गर्भवती महिलांना देणार 5000 रुपयांपर्यंतचे फायदे, जाणून घ्या सविस्तर

PMMVY News : देशातील नागरिकांसाठी केंद्र सरकारकडून सतत नवीन योजना राबवल्या जात आहेत. त्यामुळे करोडो लोकांना याचा फायदा होत आहे. आता केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत गरोदर महिलांसाठी काही योजना सुरु केल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तसेच केंद्र सरकारकडून देशातील शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी देखील अनेक योजना राबवल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. पीएम किसान योजनेमधून देखील केंद्र सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत देत आहे.

देशातील गर्भवती महिलांना पोषक अन्न मिळावे आणि देशातील कुपोषणाचा प्रभाव कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक पाऊले उचलली जात आहेत. गरोदर महिलांच्या औषधाचा खर्च कमी करण्यासाठी आणि वैद्यकीय उपचार देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे.

PMMVY योजना कशी काम करते?

PMMVY या योजनेद्वारे गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना 5,000 रुपयांचे रोख रक्कम त्यांच्या बँक खात्यात तीन हप्त्यांमध्ये जमा केली जाते. त्यामुळे त्यांच्यावरील आर्थिक भार देखील कमी होत आहे.

केंद्र सरकारकडून PMMVY योजनेअंतर्गत गरोदर महिलांच्या खात्यात ३ हफ्त्याऐंमध्ये पैसे वर्ग केले जातात. पहिला हफ्ता 1,000 रुपये गरोदरपणाची नोंदणी करताना दिला जातो. तसेच दुसरा हफ्ता २ हजार रुपये गरोदरपणाच्या सहाव्या महिन्यात तसेच तिसरा हफ्ता २ हजार रुपये मुलाच्या जन्माच्या नोंदणीनंतर दिला जातो.

PMMVY साठी कोण पात्र आहे?

केंद्र सरकारकडून PMMVY योजनांतर्गत दैनंदिन मजुरी करणाऱ्या किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल स्थितीत असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो. अशा महिलांना गरोदरपणात चांगला उपचार मिल्ने हाच या योजनेमागचा उद्देश आहे. त्यामुळे दैनंदिन मजुरी करणाऱ्या किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल स्थितीत असलेल्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

PMMVY उपक्रमाचा भारतातील मातृ आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे. या कार्यक्रमामुळे गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांसाठी वैद्यकीय उपचार आणि काळजीची सोय झाली आहे, ज्यामुळे कुपोषणाचे दुष्परिणाम कमी होतात आणि त्यांचे एकूण आरोग्य सुधारते.