Summer Vacation Trip: उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कमीत कमी खर्चात कुटुंबासमवेत भारतातील ‘या’ ठिकाणांना द्या भेट; उन्हाळ्यात घ्या थंडीचा अनुभव

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Summer Vacation Trip:- सध्या सगळीकडे प्रचंड प्रमाणात उष्णता असून उकाड्याने नागरिक त्रस्त झालेले आहेत. तसेच दुसरे म्हणजे या कालावधीत मुलांच्या परीक्षा संपल्या असून आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्याने अनेकजण आता कुटुंबासोबत कुठेतरी ट्रीप प्लान करतात.

ट्रिप प्लॅन करताना जास्त करून उन्हाळ्यामध्ये थंड हवेच्या ठिकाणांना प्राधान्य दिले जाते  व यामध्ये सगळ्यात महत्वाच्या गोष्टीचा विचार केला जातो तो म्हणजे आपला बजेट होय. कमीत कमी बजेटमध्ये आपल्या संपूर्ण कुटुंबाला चांगल्या ठिकाणी या उन्हाळ्यामध्ये फिरता येईल अशा पद्धतीने ट्रिप प्लॅन करण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करत असतो.

त्यामुळे तुमचा देखील या उन्हाळ्यामध्ये कुटुंबा समवेत ट्रिप प्लान करायची असेल व तीही तुमच्या बजेटमध्ये तर या लेखामध्ये आपण अशाच काही ठिकाणांची माहिती घेणार आहोत. जे उन्हाळ्यात फिरण्यासाठी उत्तम आहेतच व त्या ठिकाणी खर्च देखील कमी लागतो.

 कमी खर्चात या ठिकाणी द्या भेट

1- लोणावळा लोणावळा हे आपल्यापैकी प्रत्येकाला माहीत असलेले महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध असे थंड हवेचे ठिकाण आहे. या ठिकाणी उन्हाळ्यात देखील अतिशय थंडगार आणि मनाला आल्हाददायक वाटेल असे वातावरण असते.

या ठिकाणी असलेले उंच उंच पर्वत तसेच डोंगर दऱ्या, धबधबे तसेच आसपास असलेले किल्ले व मनाला भुरळ पडेल असे निसर्ग सौंदर्य तुम्हाला पाहता येते. दहा हजार रुपये खर्चामध्ये तुम्ही एक शॉर्ट ट्रिप कुटुंबासोबत या ठिकाणी प्लान करू शकतात.

2- हिमाचल प्रदेश उन्हाळ्यामध्ये प्रामुख्याने थंड हवेचे आणि पर्वतीय भागांना फिरण्यासाठी पसंती दिली जाते. जर तुम्हाला देखील असाच काहीतरी प्लान आखायचा असेल तर तुम्ही हिमाचल प्रदेश मध्ये जाऊ शकतात. दहा हजार रुपयांमध्ये तुम्ही या ठिकाणची ट्रिप आयोजित करू शकतात.

या संपूर्ण राज्यातील वातावरण चांगल्या प्रकारे थंड असून कुटुंबासोबत वेळ घालवायला या ठिकाणी खूप वाव आहे. पूर्ण हिमाचल प्रदेशामध्ये उन्हाळ्यात भेट देता येतील असे अनेक चांगले चांगले ठिकाणे आहेत.

3- जैसलमेर राजस्थान हे त्याच्या वेगळ्या लोकसंस्कृती आणि परंपरांच्या बाबतीत ओळखले जाते. या ठिकाणी जायला त्यामुळे अनेक पर्यटक पसंती देतात. या ठिकाणी तुम्हाला उंट आणि हत्तीची सवारी करता येते.

तसेच तुम्ही तंबूमध्ये राहण्याची मजा घेऊ शकतात. जैसलमेरला गेल्यावर तुम्ही आजूबाजूची पर्यटन स्थळे पाहू शकतात. त्यामध्ये प्रामुख्याने गडी सर तलाव, पटवो की हवेली आणि खाबा किल्ला यासारख्या ठिकाणांना देखील भेट देऊ शकतात.