Mumbai Bharti 2024 : महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीत नोकरीची सुवर्णसंधी; आजच या पत्त्यावर पाठवा अर्ज…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahatma Phule Education Society Mumbai : महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी मुंबई अंतर्गत सध्या विविध जागा भरल्या जाणार असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज  मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.

वरील भरती अंतर्गत “प्राचार्य, सहायक प्राध्यापक आणि प्राध्यापक” पदांच्या एकूण 23 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2024 असून, उमेदवारांनी ताबडतोब आपले अर्ज सादर करावेत.

शैक्षणिक पात्रता

वरील पदांसाठी पदवीधर असणे आवश्यक आहे, तरी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात वाचावी.

अर्ज पद्धती

यासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

वरील पदांसाठी अर्ज मुख्य कार्यकारी अधिकारी, महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी, मुंबई. या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

या भरती संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी https://day.phuleeducation.org/ ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

-अर्ज हा पूर्ण भरलेला असावा अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

-अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपे आपले अर्ज सादर करावेत.