Bank of Baroda Bharti 2024 : पदवीधर उमेदवारांना बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची उत्तम संधी; मुंबईत सुरु आहे भरती; असा करा अर्ज…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank of Baroda Bharti 2024 : बँकेत नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. बँक ऑफ बडोदा (BOB) मुंबई अंतर्गत सध्या भरती सुरु असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात आहेत, उमेदवार खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पोस्टाने सादर करू शकतात.

बँक ऑफ बडोदा (BOB) अंतर्गत “बीसी पर्यवेक्षक” पदांच्या एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2024 असून, अर्ज देय तारखे अगोदर सादर करायचे आहेत.

बीसी पर्यवेक्षक पदासाठी उमेदवाराचे कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेत ग्रामीण बँकिंगचा किमान ३ वर्षांचा अनुभव, नियुक्तीच्या वेळी कमाल वय ६४ वर्षांपेक्षा जास्त नसावे. तरुण उमेदवार किमान पदवीधर तसेच चांगले संगणक ज्ञान असलेले असावे. येथे अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 21 ते 45 वर्षे इतकी आहे.  या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 15000/- रुपये इतका पगार मिळेल.

अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवायचे आहेत. यासाठी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, तुम्हाला या भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.bankofbaroda.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
-अर्ज करण्यासाठी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.
-अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 20 जानेवारी 2024 आहे.
-लक्षात घ्या अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.