12 वी नंतर करा ‘हे’ अभ्यासक्रम आणि मिळवा लाखात पगार! वाचा कुठला अभ्यासक्रम केल्याने किती मिळेल पगार?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बारावी शिक्षणाच्या दृष्टीने आणि तुमच्या आयुष्याच्या एकंदरीत पुढच्या करिअरच्या दृष्टिकोनातून आवश्यक वाटचालीकरिता खूप मोठा टर्निंग पॉईंट आहे. कारण बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही कुठला अभ्यासक्रमाला जात आहात किंवा कुठला अभ्यासक्रमाची निवड करत आहात  यावर तुमचे करिअरचे भवितव्य ठरलेले असते.

त्यामुळे बऱ्याचदा या टर्निंग पॉईंटच्या कालावधीमध्ये विद्यार्थी आणि पालक यांचा बराच गोंधळ उडतो. बऱ्याचदा आपल्याला उमजत नाही की नेमका कोणता अभ्यासक्रमाला ऍडमिशन घ्यावे किंवा कुठला अभ्यासक्रम करू नये? कारण आपण कुठलाही अभ्यासक्रम निवडताना सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या करिअरचा विचार करत असतो व तो अभ्यासक्रम केल्यानंतर आपल्याला भविष्यात मिळणारी नोकरी आणि त्यातून मिळणारा पगार याचा विचार प्रामुख्याने करतो.

कारण या ठिकाणी जर चूक झाली तर त्याचा पश्चाताप आयुष्यभर करण्याची वेळ येण्याची शक्यता असते. याच अनुषंगाने या लेखांमध्ये आपण बारावीनंतर करता येणारे  काही महत्त्वाच्या अभ्यासक्रम पाहणार आहोत व अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्हाला भविष्यात नोकरी कशी मिळू शकते किंवा किती पगार मिळू शकतो? त्याबद्दलचे महत्त्वपूर्ण माहिती घेणार आहोत.

 बारावीनंतर करता येण्यासारखे महत्त्वाचे अभ्यासक्रम

1- बी.एस.सी इन कम्प्युटर सायन्स( संगणक विज्ञान)- हा एक बारावीनंतर करता येण्यासारखा महत्त्वाचा अभ्यासक्रम असून या माध्यमातून प्रोग्रामिंग हे अल्गोरिदम आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट वर काम करतात. यामध्ये सॉफ्टवेअर किंवा सॉफ्टवेअर डेटा अनॅलिस्ट म्हणून भूमिका पार पडणारे वेब डेव्हलपर्सला एका वर्षाला तीन ते सहा लाख रुपयांचे पॅकेज मिळू शकते. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आयटी आणि संशोधन क्षेत्रामध्ये खूप मोठी संधी आहे.

2- बीसीए( बॅचलर ऑफ कम्प्युटर एप्लीकेशन)- बीसीए, कंप्यूटर एप्लीकेशन आणि प्रोग्रामिंग हे भाषांवर जोर देते व सॉफ्टवेअर टेस्टिंग, वेब डेव्हलपमेंट किंवा सिस्टीम ऍडमिनिस्ट्रेशन सारख्या पदांवर पदवीधरांना वार्षिक अडीच ते पाच लाख रुपये पर्यंत पगार मिळू शकतो. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सहकारी संस्था तसेच ई-कॉमर्स कंपन्या व आयटी कंपन्यांमध्ये मोठी संधी आहे.

3- संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी अर्थात बी.टेक इन कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग या अंतर्गत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि प्रोग्रामिंगचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळते व या माध्यमातून पदवीधरांना वार्षिक दहा लाख पॅकेज मिळण्याची शक्यता असते. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना आयटी तसेच स्टार्टअप आणि रिसर्च क्षेत्रामध्ये प्रचंड संधी आहे.

4- बीई इन कॉम्प्युटर सायन्स यामध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सिस्टम शिकवले जाते. नेटवर्क इंजिनियर तसेच सॉफ्टवेअर इंजिनियर किंवा डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर अशा पदांवर काम करण्याची संधी हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मिळते. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक चार ते आठ लाख रुपयांचे पॅकेज मिळू शकते. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग आणि कम्युनिकेशन आणि आयटी क्षेत्रामध्ये खूप मोठ्या संधी आहेत.

5- बी.टेक इन इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजी अर्थात माहिती तंत्रज्ञान या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किंवा सॉफ्टवेअर विकास, कॉम्प्युटर सिस्टम आणि नेटवर्क प्रशासन यांचा अंतर्भाव असून हा  अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर किंवा सायबर सिक्युरिटी अनालिस्ट किंवा सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून वार्षिक चार ते नऊ लाख रुपयांचा पगार किंवा पॅकेज मिळू शकते. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या तरुणांना आयटी किंवा फायनान्स तसेच सरकारी फिल्डमध्ये देखील खूप मोठी संधी आहे.

6- बी.एस.सी इन डेटा सायन्स अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी हे प्रामुख्याने डेटा एनालीस, स्टॅटिस्टिक्स मॉडेलिंग अर्थात सांख्यिकीय मॉडेलिंग वर काम करतात. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर डेटा अनालिस्ट, सायंटिस्ट किंवा बी आय ऍनालिस्ट म्हणून काम करण्याची संधी मिळते व वर्षाला पाच ते दहा लाख रुपयांचे पॅकेज मिळू शकते. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना अनालिटीक्स आणि एआय इंडस्ट्रीमध्ये चांगला भाव आहे.

7- बी.एस.सी इन सायबर सिक्युरिटी एथिकल हॅकिंग किंवा मॅनेजमेंट नेटवर्क सेक्युरिटी यासाठी हा अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी काम करतात. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सायबर सुरक्षा तज्ञ, प्रवेश परीक्षक किंवा अधिकारी या पदांवर काम करण्याची संधी मिळते व वर्षाला चार ते आठ लाख रुपयांची पॅकेज मिळू शकते. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना सायबर सिक्युरिटी कंपन्या तसेच फायनान्स व सरकार यामध्ये काम करण्याची संधी मिळते.