Job Alert : आता नोकरी मिळवणे झाले सोप्पे ! ग्रेजुएशन शिवाय मिळेल लाखो पगाराची नोकरी; फक्त करा ‘हे’ काम

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Job Alert : कोरोना काळापासून लोकांना नोकरी मिळवणे कठीण झाले आहे. कारण कोरोना सारख्या भयंकर संकटातून बाहेर पडल्यानंतर देशात बेरोजगारांची संख्या वाढत होती, त्यामुळे सर्वजण नोकरीच्या शोधात होते.

अशा वेळी चांगल्या पगाराची नोकरी मिळवणे सर्वांचे स्वप्न असते. जर पगार चांगला असेल तर तुम्ही तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करू शकता. मात्र जर तुम्ही नोकरी मिळत नाही म्हणून टेन्शनमध्ये असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खास आहे.

कारण देशात अशी अनेक ठिकाणे आहेत जी तुम्हाला नोकरी देतात. मात्र तुम्ही तिथपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. तसेच पदवीशिवाय नोकरी मिळणे कठीण असल्याचा भारतीय जॉब मार्केटमध्ये समज आहे. पण, आता कंपन्यांचा दृष्टिकोन बदलत आहे.

अशी अनेक फील्ड्स आहेत, जिथे ग्रॅज्युएशनशिवाय चांगल्या पॅकेजेसच्या नोकऱ्याही उपलब्ध आहेत. लिंक्डइनच्या नुकत्याच झालेल्या अहवालाने वर्षानुवर्षे चालत आलेला समजही बदलला आहे.

कोरोनाच्या कालावधीनंतर कंपन्यांचा दृष्टीकोन बदलला असून आता त्या पदवीऐवजी कौशल्याला प्राधान्य देत आहेत. ZipRecruiter नुसार आता पदवीचे महत्त्व कमी होत आहे. ब्यूरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्स असेही म्हणते की 2030 नंतर, बहुतेक नवीन नोकऱ्यांना पदवी आवश्यक नाही. त्याच धर्तीवर, लिंक्डइनने 2021 ते 2023 दरम्यान नोकरी सुरू करणाऱ्यांच्या प्रोफाइलची तपासणी केली असून अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

कन्सल्टंट हे सर्वात मोठे क्षेत्र आहे जे बॅचलर डिग्रीशिवाय नोकऱ्या देते. येथे, 2021 ते 2022 दरम्यान, 34 टक्के भरती वाढ झाली आहे. त्यासाठी पदवीऐवजी स्पेशलायझेशनला महत्त्व देण्यात आले आहे. पदवी नसतानाही ग्राहक सल्लागार, व्यवसाय सल्लागार, सोल्युशन कन्सल्टंट अशा भूमिकांमध्ये लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत.

पदवीशिवाय नोकऱ्या देण्याच्या बाबतीत मार्केटिंग हे दुसरे सर्वात मोठे क्षेत्र आहे. या क्षेत्रात, सोशल मीडिया मॅनेजर ते मार्केटिंग स्‍पेशलिस्‍ट आणि कोऑर्डिनेटर पर्यंत नोकऱ्या आहेत.

संशोधन हे असे क्षेत्र आहे, ज्यासाठी सामान्यतः खूप शिक्षित लोकांची आवश्यकता असते. परंतु, आता प्रयोगशाळा तंत्रज्ञ, व्यवसाय विश्लेषक आणि वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ यासारख्या भूमिकांसाठी पदवीशिवाय नोकऱ्या दिल्या जात आहेत. या क्षेत्रात प्रयोग, डेटा विश्लेषण आणि संशोधन सहाय्यक म्हणूनही नोकऱ्या दिल्या जात आहेत.

कंपन्या बॅचलर डिग्रीशिवाय ह्युमन रिसोर्सेस-एचआर भूमिकांसाठी नोकऱ्याही देऊ करत आहेत. कंपन्या पदवीपेक्षा संवाद आणि नेतृत्व कौशल्याला अधिक महत्त्व देत आहेत. त्यांचे काम कंपन्यांसाठी पात्र आणि कार्यक्षम कर्मचारी शोधणे आणि कार्यालयात चांगले कामाचे वातावरण राखणे हे आहे.

मीडिया आणि कम्युनिकेशनच्या क्षेत्रातही नॉन-बॅचलर पदवीधरांसाठी नोकरीच्या अनेक संधी आहेत. या क्षेत्रातील कंपन्या लेखक, उत्पादन सहाय्यक, संपादक आणि उत्पादन व्यवस्थापक यांच्या भूमिकेसाठी नोकऱ्या देतात. याशिवाय कंटेंट क्रिएटर्सच्या अनेक नोकऱ्या दिल्या जातात. ZipRecruiter नुसार, या नोकरीसाठी, 1 लाख ते 1.67 लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे 1.25 कोटी रुपयांपर्यंतचे वार्षिक पॅकेज जॉब ऑफर केले जाते.