अहमदनगरमध्ये नोकरीची संधी ! आर्मी पब्लिक स्कूलमध्ये ‘या’ पदासाठी निघाली भरती, कसा करणार अर्ज? वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Army Public School Recruitment : नवीन वर्ष म्हणजे 2024 हे नवीन वर्ष सुरू होण्यासाठी आता मात्र चार दिवसांचा काळ बाकी आहे. यामुळे राज्यासह संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकजण आता वेगवेगळ्या पर्यटन स्थळांवर भेटी देण्याचे प्लॅन देखील बनवत आहेत. 31 डिसेंबर सेलिब्रेट करण्यासाठी आत्तापासूनच अनेकांनी तयारी सुरू केली आहे.

असे असतानाचं नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. विशेषता ज्या तरुणांना अहमदनगर मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल अशा तरुणांसाठी ही बातमी खूपच खास राहणार आहे. कारण की अहमदनगर येथे असलेल्या आर्मी पब्लिक स्कूलमध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

या पदभरती अंतर्गत या स्कूलमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे तरुणांना अहमदनगर जिल्ह्यात काम करण्याची एक सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. अहमदनगर येथील आर्मी पब्लिक स्कूल मध्ये निघालेल्या या पदभरतीची अधिसूचना सुद्धा नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. अशा परिस्थितीत, आज आपण या पदभरतीची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या पदांसाठी होणार भरती

अहमदनगर आर्मी पब्लिक स्कूल मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट टीचर, ट्रेन ग्रॅज्युएट टीचर, मुख्याध्यापिका, प्रायमरी टीचर्स, प्री प्रायमरी टीचर्स, स्पेशल एज्युकेटर, कौन्सिलर, ऍक्टिव्हिटी टीचर्स, आयटी सुपरवायझर, लायब्रररीयन अँड असिस्टंट लायब्ररीयन, हेड क्लर्क, लोवर डिव्हिजन क्लर्क, ऍडमिनिस्ट्रेटर सुपरवायझर, रिसेप्शनिस्ट, कंप्यूटर लॅब टेक्निशियन, सायन्स लॅब अटेंडंट, ATL लॅब असिस्टंट, डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक अहर्ता

वर नमूद केलेल्या पदासाठी पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आवश्यक राहणार आहे. यामुळे शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर यांनी जारी केलेली अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक राहणार आहे.

नोकरी करण्याचे ठिकाण कोणते राहणार

वर दिलेल्या पदासाठी नियुक्त झालेल्या उमेदवारांना अहमदनगर जिल्ह्यात नोकरी करावी लागणार आहे.

अर्ज कसा करावा लागणार

या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. प्राचार्य, आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर, सी/ओ एसी सेंटर अँड स्कूल, अहमदनगर – ४१४००२ या पत्त्यावर इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज विहित मुदतीत सादर करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक

या भरतीसाठी 22 जानेवारी 2024 पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवारांना वर दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या तारखेनंतर सादर झालेल्या अर्जावर कोणत्याही परिस्थितीत आणि कुठल्याही सबबीवर विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे.

जाहिरातीची पीडीएफ कुठे पाहणार

https://drive.google.com/file/d/1pn63yzKeFkLNIzu_CHDRBEJDXkN-PFSs/view?usp=drivesdk या लिंक वर जाऊन या भरतीची सविस्तर जाहिरात पाहता येणार आहे.