तरुणांसाठी आनंदाची बातमी ! राज्यातील ‘या’ महापालिकेत 1178 रिक्त पदांच्या जागांसाठी मेगाभरती; कोणते उमेदवार राहणार पात्र? वाचा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Government Job : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आजची ही बातमी विशेष खास राहणार आहे. विशेषता ज्या तरुणांना राजधानी मुंबईत नोकरीची इच्छा असेल अशा तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

कारण कि, बृहन्मुंबई महानगरपालिकेत काही रिक्त जागांच्या पदभरतीसाठी जाहिरात निर्गमित करण्यात आली आहे. यानुसार महानगरपालिकेत काही पदाच्या रिक्त असलेल्या 1178 जागा भरल्या जाणार आहेत.

यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून नुकतीच अधिसूचना निर्गमित करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने विहित कालावधीमध्ये सादर करण्याचे आवाहन केले जात आहे. अशा परिस्थितीत आज आपण या पदभरती संदर्भात सर्व आवश्यक माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आज आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेत कोणत्या रिक्त पदांची भरती होणार आहे, यासाठी अर्ज कसा करावा लागणार, अर्ज करण्याची अंतिम दिनांक, आवश्यक शैक्षणिक पात्रता यांसारखी सर्व महत्त्वाची माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- ‘हा’ स्टॉक ठरला शेअर मार्केटचा बादशाह ! ‘इतक्या’ वर्षातच गुंतवणूकदाराचे 60 हजाराचे बनवलेत 10 कोटी, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आली फळाला

कोणत्या पदासाठी होणार भरती?

बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक म्हणजेच एक्झिक्यूटिव्ह असिस्टंट या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

किती जागांसाठी होणार भरती?

यापद्धतीच्या माध्यमातून कार्यकारी सहाय्यक पदाच्या 1178 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता?

या पदासाठी वाणिज्य, विज्ञान, कला, विधि किंवा तत्सम शाखांचे पदवीधर उमेदवार पात्र राहणार आहेत. सोबतच उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये मराठी आणि इंग्रजी हे विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराने मराठी आणि इंग्रजी टायपिंग चा कोर्स केलेला असणे आवश्यक आहे. तत्सम प्रमाणपत्र देखील उमेदवाराकडे आवश्यक आहे. याबाबतची अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आलेली आहे त्यामुळे एकदा अधिसूचना वाचणे गरजेचे आहे.

हे पण वाचा :- दहावी, बारावी उत्तीर्ण तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! सशस्त्र सीमा दलात ‘या’ जागांसाठी निघाली मोठी भरती, आजच करा अर्ज

किती पगार मिळणार?

या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 21 हजार 700 ते 69 हजार 100 दरम्यान वेतन मिळणार आहे.

अर्ज कसा करावा लागणार?

या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने आपला अर्ज सादर करायचा आहे. https://ibpsonline.ibps.in/bmceaapr23/ या लिंक वर जाऊन इच्छुक उमेदवार आपला अर्ज सादर करू शकतात.

अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक?

या पदासाठी 16 जून 2023 पर्यंत इच्छुक उमेदवारांना अर्ज सादर करता येणार आहे. यानंतर सादर झालेल्या अर्जावर कोणत्याही सबबीवर विचार केला जाणार नाही याची दक्षता उमेदवारांनी घ्यायची आहे. 

हे पण वाचा :- मोठी बातमी ! मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर जाहीर; केव्हापासून धावणार, कुठं राहणार थांबा? वाचा…..