MPSC : एमपीएससी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्यसेवा आयोगाकडून पदभरतीत मोठी वाढ, एवढ्या पदांसाठी होणार भरती…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : जर तुम्ही स्पर्धा परीक्षांचा (competitive examinations) अभ्यास (Study) करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission) पद भरतीच्या संख्येत वाढ केली आहे.

एमपीएससीच्या (MPSC) या वर्षीच्या परीक्षेत 340 पदांची भर (Addition of posts) पडली आहे. उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक या पदांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता एकूण 501 पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

एमपीएससीकडून 11 मे ला राज्यसेवा पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यात 161 पदांचा समावेश होता. मात्र शासनाकडून आता अन्य पदांची मागणीपत्रे एमपीएससीला देण्यात आल्याने ही पदे राज्यसेवा 2022 च्या पदभरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.

राज्यसेवा 2022 च्या जाहिरातीमध्ये केवळ 161 पदेच असल्याने स्पर्धा परीक्षार्थीकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती, मात्र आता गट ‘अ’ आणि गट ‘ब’ संवर्गाची मिळून 340 पदे वाढल्याने एकूण 501 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाईल.

पदभर्तीत वाढ झाली (Increase in recruitment)

जागा कमी असल्याची तक्रार एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी या वर्षीच्या परीक्षेत 340 पदांची भर पडली आहे. उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक या पदांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता एकूण 501 पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

एमपीएससीकडून 11 मे ला राज्यसेवा पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यात 161 पदांचा समावेश होता. मात्र शासनाकडून आता अन्य पदांची मागणीपत्रे एमपीएससीला देण्यात आल्याने ही पदे राज्यसेवा 2022 च्या पदभरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.

वाढलेल्या पदांमध्ये उपजिल्हाधिकारी गट ‘अ’ संवर्गाची 33, पोलीस उपअधीक्षक गट ‘अ’ संवर्गाची 41, सहाय्यक राज्यकर आयुक्त गट ‘अ’ संवर्गाची 47, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गट ‘अ’ संवर्गाची 14, उपनिबंधक सहकारी संस्था गट ‘अ’ संवर्गाची दोन पदांची भरती वाढवण्यात आली आहे.

स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी विद्यार्थी ग्रामीण भागातून शहरात येतात. विशेषत: पुण्यात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. पण मागच्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे सगळ्याच क्षेत्रावर परिणाम झाला.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा अकोला जिल्ह्यात होतेय. उद्या ही परीक्षा होणार आहे. 3 हजार 457 परीक्षार्थी उद्या परीक्षा होत आहे. अकोल्यातील एकूण 12 उपकेंद्रावर दोन सत्रात ही परीक्षा पार पडेल.

सकाळी 8 ते संध्याकाळी 5 या वेळेत ही परीक्षा होईल. परीक्षा शांत, सुरक्षित आणि व्यवस्थित रित्या पार पाडण्यासाठी यासाठी सर्व परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आहेत.