राजधानी मुंबईत नोकरीची संधी ! मुंबई महापालिकेत ‘या’ रिक्त पदांसाठी भरती, 12 वी पास उमेदवार राहणार पात्र, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Jobs : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी बातमी आहे. ही बातमी राजधानी मुंबईत नोकरीं करू इच्छिणाऱ्यांसाठी अधिक महत्त्वाची आणि आनंदाची राहणार आहे. जर तुमचे मुंबईत नोकरी करण्याचे स्वप्न असेल तर तुमचे हे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे.

कारण की मुंबई महापालिकेत विविध रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना देखील महानगरपालिकेने निर्गमित केली असून इच्छुक अन पात्र उमेदवारांना या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज सादर करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

अशा परिस्थितीत आता आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेत निघालेल्या या पदभरतीची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणती रिक्त पदे भरली जाणार 

डेटा एंट्री ऑपरेटर आणि हेमोडायलिसिस तंत्रज्ञ या पदाच्या रिक्त जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.

किती जागा भरल्या जाणार

या पदभरतीच्या माध्यमातून डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि हेमोडायलिसिस तंत्रज्ञ या दोन रिक्त पदाच्या दहा जागा भरणे प्रस्तावित करण्यात आले आहे. यामध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर च्या सात जागा आणि हेमोडायलिसिस तंत्रज्ञ या पदाच्या तीन जागा भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी पदवीधर उमेदवार पात्र राहणार आहे. तसेच उमेदवाराने एमएस-सीआयटी पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे इंग्रजी व मराठी टंकलेखनाची प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र सुद्धा असावे. डेटा एन्ट्री ऑपरेटर या कामाचा ज्या उमेदवाराला अनुभव असेल त्याला प्राधान्य दिले जाणार आहे.

हेमोडायलिसिस तंत्रज्ञ : या पदासाठी बारावी पास ( विज्ञान शाखेचा असल्यास प्राधान्य) तसेच डायलिसिस टेक्निशियन कोर्स केलेला असणे आवश्यक. कोर्स किमान सहा महिन्याचा असला पाहिजे. तसेच या कामाचा त्याला अनुभव असेल त्याला या भरतीमध्ये प्राधान्य मिळणार आहे.

अर्ज कसा करायचा आहे

अर्ज ऑफलाइन पद्धतीने टो. रा. वैद्यकीय महाविद्यालय आणि बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालय, डॉ. ए.एल. नायर रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई – 400 008. या पत्त्यावर पाठवायचे आहेत. अर्ज विहित नमुन्यात पाठवायचा आहे. 

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक

या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना 15 मार्च 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहेत.

जाहिरात कुठं पाहणार ?

खाली दिलेल्या लिंक वर डाटा एन्ट्री ऑपरेटर आणि हेमोडायलिसिस तंत्रज्ञ या पदाच्या रिक्त जागांच्या भरतीची जाहिरात आहे. 

https://drive.google.com/file/d/1ordjYVCLT2Joz8sV9XQuUBf6tdhj9h4v/view?usp=drivesdk

https://drive.google.com/file/d/19vtn6VVd96qNRj5s33A7XJZvmH-ZyNkG/view?usp=drivesdk