UPSC Exam News : विद्यार्थ्यांनो लक्ष द्या… ! UPSC मुख्य परीक्षेची प्रश्नपत्रिका जाहीर, खालील पद्धतीने डाउनलोड करा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

UPSC Exam News : तुम्ही UPSC चा अभ्यास करत असाल तर तुम्ही याअंतर्गत विभागाने (department) दिलेली महत्वाची माहिती जाणून घ्या. यामध्ये UPSC ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार नागरी सेवा मुख्य परीक्षा 16, 17, 18,24 आणि 25 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे.

अशा प्रकारे प्रश्नपत्रिका डाउनलोड (Question Paper Download) करू शकता

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा मुख्य परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका जाहीर केली आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार (candidate) यूपीएससी – upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पेपर डाऊनलोड करू शकतात. या रिक्त जागेसाठी परीक्षा सुरू आहेत. 16 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या कालावधीत या परीक्षा होणार आहेत.

दरम्यान यूपीएससी सीएसई 2022 (UPSC CSE 2022) परीक्षांचा 16 आणि 17 सप्टेंबर रोजी होणारा पेपर जाहीर झालाय. यूपीएससीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार नागरी सेवा मुख्य परीक्षा 16, 17, 18,24 आणि 25 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेला बसणारे उमेदवार खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून प्रश्नपत्रिका डाउनलोड (Question Paper Download) करू शकतात.

UPSC CSE प्रश्नपत्रिका

या अधिकृत संकेतस्थळावर जा- upsc.gov.in
वेबसाइटच्या होम पेजवर Examination वर क्लिक करा.
यानंतर, Civil Services (Main) Examination, 2022 च्या लिंकवर क्लिक करा.
आता Document: Question Paper या पर्यायावर जा.
यानंतर General Studies च्या पेपर कोडच्या लिंकवर जा.
प्रश्नपत्रिका पीडीएफ स्वरूपात उघडेल.
पेपरची प्रिंट घ्या
यूपीएससी नागरी सेवांवर आधारित भरती प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखती या तीन टप्प्यांमध्ये आयोजित केल्या जातात.

जे उमेदवार सीएसई मुख्य परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखतीतील उमेदवारांच्या कामगिरीच्या आधारे यूपीएससी नंतर नागरी सेवांचा निकाल जाहीर करते.

UPSC नागरी सेवा मुख्य प्रश्नपत्रिका 2022 जारी – थेट लिंक

त्यानंतर यूपीएससी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना आयएएस, आयएफएस, आयआरएस, आयपीएस आणि इतर प्रीमियम सरकारी पदांवर नियुक्त केले जाते.

यूपीएससीने मुलाखतीचे वेळापत्रक आणि यूपीएससी नागरी सेवा 2022 चा निकाल (Result) जाहीर करण्याची वेळ आणि तारीख जाहीर केलेली नाही.

संघ लोकसेवा आयोगाकडून General Studies चा पेपर जाहीर करण्यात आलाय. आतापर्यंत झालेल्या परीक्षांमध्ये General Studiesच्या पेपरचे चार संच जाहीर झाले आहेत. उमेदवार थेट वेबसाइटवरून पेपर डाउनलोड करू शकतात.