Agriculture Advice! महाराष्ट्रात आहे पावसाचा मोठा खंड! अशाप्रकारे करा पाण्याच्या ताणाचे नियोजन, वाचा कृषी तज्ञाचा सल्ला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture Advice :- सध्या महाराष्ट्रातील परिस्थिती पाहिली तर खूपच भयानक झाली असून दुष्काळाची चाहूल लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक दिवसापासून पावसाचा खंड पडला असल्याने खरिपाची पिके करपण्याच्या  मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागेल की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांना डब्याने पाणी देऊन पिके जगवण्याची वेळ आली आहे.

जर आपण पावसा संबंधी हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यांच्या मते सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून महाराष्ट्रामध्ये सर्वदूर चांगला पाऊस होईल असा अंदाज वर्तवलेला आहे. परंतु तोपर्यंत आहे त्या पाण्यामध्ये पिकांचे व्यवस्थापन करणे खूप गरजेचे असल्यामुळे या पद्धतीने नियोजन करणे आवश्यक आहे.

या कालावधीमध्ये आता पिकांसाठी पाण्याचा ताण व्यवस्थापनाची आवश्यकता असून या ताणाचे व्यवस्थापन करणे खूप गरजेचे आहे. याकरिता ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख कृषी विज्ञान केंद्र, मदनापुरम तेलंगानाचे डॉ. दादासाहेब खोगरे यांनी सोयाबीन, मका, कापूस, मसूर आणि एरंडी पिकासाठी काही महत्त्वाचा कृषी सल्ला दिला आहे.

 सध्या पावसाच्या ताणाचे पिकांसाठी असे करावे व्यवस्थापन

महाराष्ट्रामध्ये सध्या पावसाची स्थिती भयानक झाली असून अनेक दिवसापासून पावसाचा खंड पडल्यामुळे पिकांना पाण्याचा ताण सहन करता यावा याकरिता व्यवस्थापनाची आवश्यकता असून त्याकरिता…..

1- तीन टक्के केओलीन स्प्रे ओलावा तणावाच्या गंभीर टप्प्यावर तसेच 500 पीपीएम सायकोसेलची पानांवरची फवारणी( एक मिली प्रति लिटर करणे गरजेचे आहे.

2- तसेच भात आणि उसाचा जो काही कचरा असतो त्याचे आच्छादन करणे गरजेचे असून जेणेकरून पाण्याची बाष्पीभवन कमी होईल व ते कमी झाल्यानंतर साधारणपणे 20 टक्क्यांपर्यंत पाण्याची बचत करणे शक्य होईल.

3- पेरणीनंतर 45 आणि 60 दिवसांनी कपाशी करिता नायट्रोजन आणि पोटॅशियम खतांचा वापर करणे गरजचे आहे.

4- अझोस्पीरिलम किंवा फॉस्फोबॅक्टेरिया दहा पॅकेट/ प्रति हेक्टर 25 किलो माती किंवा शेणखत

5- तसेच 0.5% झिंक सल्फेट + 0.3% बोरिक ऍसिड + 0.5% फेरस सल्फेट + एक टक्के युरियाची फवारणी ओलावा तणावाच्या गंभीर टप्प्यामध्ये करावी.

6- तसेच महत्त्वाचे म्हणजे उपलब्ध पाण्यामध्ये नियोजन करताना स्प्रिंकलर आणि ठिबकचा वापर करणे खूप गरजेचे आहे.