Agriculture Jugaad : या शेतकऱ्याने कोळपणीसाठी केला जुगाड! वाचेल शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture Jugaad: शेतीतील महत्त्वाचे कामे आणि लागणारे मजूर ही समस्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. कारण शेतीची कामे वेळेवर करणे गरजेचे असते. परंतु  त्यासाठी लागणारे मजूर मात्र वेळेवर उपलब्ध होत नाही. झाले तरी मजुरीचे दर हे शेतकऱ्यांना खूपच मारक असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढतो. तसेच मजूर जरी मिळाले तरी त्यांच्या माध्यमातून होणाऱ्या कामाला वेळ खूप लागतो.

त्यामुळे शेतकरी कायमच चिंताग्रस्त असतात. मग अशा समस्या वारंवार येत गेल्यामुळे शेतकरी अशा कामांकरिता काहीतरी डोक्याचा वापर करतात व त्यातूनच बऱ्याच प्रकारच्या जुगाडांची निर्मिती होते. नंतर असेच जुगाडच शेतकऱ्यांना काम वेळेवर करण्याला मदत करतातच परंतु वेळ आणि पैसा देखील वाचवतात. या दृष्टिकोनातून जर आपण पिकांच्या आंतरमशागतीचा विचार केला तर यामध्ये कोळपणी सारखे काम हे सगळ्यात महत्त्वाचे समजले जाते.

साधारणपणे कोळपणी करिता बैलांच्या साह्याने ती केली जाते. परंतु सगळ्या शेतकऱ्यांकडे बैल असतात असे नाही आणि भाड्याने जरी कोळपणी केली तरी त्याचे दर हजार ते बाराशे रुपये प्रति दिवस अशा प्रमाणे वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी तयार केलेले जुगाड यंत्र शेतकऱ्यांना फायद्याचे ठरतात. याच अनुषंगाने विचार केला तर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अशाच पद्धतीने तन नियंत्रणा करिता व कोळपणी करता यावी याकरिता वेगळ्या पद्धतीने जुगाड केलेले आहेत. त्यांचीच माहिती आपण बघणार आहोत.

 नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यानी कोळपण्यासाठी केले अनोखे जुगाड

बालाजी जाधव नावाची शेतकरी हे नांदेड जिल्ह्यातील कृष्णूर या गावचे राहणारे असून त्यांनी कोळपणी करता यावी याकरिता मोटरसायकलीच्या मदतीने चालवता येईल असे कोळपणी यंत्र बनवले आहे. बैलांच्या मदतीने कोळपणी करायचे तर त्याला खूप पैसा आणि वेळ देखील खर्च व्हायचा.याकरिता जाधव यांनी मोटरसायकलीच्या मदतीने कोळपणी करता येईल असे यंत्र तयार करून लागणारा वेळ आणि पैसा देखील वाचवला आहे.

परिसरातील शेतकरी हा जुगाड पाहण्यासाठी गर्दी करत असून साडेतीनशे रुपये खर्चात बऱ्याच मोठ्या क्षेत्राचे कोळपणी करता येणे शक्य होते. बैलांच्या मदतीने जर कोळपणी करायची असेल तर चार माणसे लागत होती परंतु आता ही यंत्र एकाच वेळी चार एकर शेतीची कोळपणी करू शकते व लागणारी मजुरी देखील यामुळे वाचली आहे. तसेच बिलोली तालुक्यातील हुनगुंदा या गावच्या शेतकऱ्यांनी देखील असाच एक अनोखा जुगाड केला असून

चक्क ट्रॅक्टरच्या सहाय्याने चालवता येईल असे कोळपणी यंत्र तयार करून ते ट्रॅक्टरला जोडले आहे. या यंत्राच्या मदतीने एक लिटर डिझेलमध्ये दोन एकर क्षेत्रातील कोळपणी आरामात होते. त्यामुळे पैसा आणि वेळ दोन्हींमध्ये मोठ्या प्रमाणावर बचत होते. यासाठी जास्त खर्च आला नसून काही रुपयांच्या खर्चातून या शेतकऱ्यांनी हे देशी जुगाड तयार केले असून शेतकऱ्यांसाठी ते खूप फायदेशीर ठरत आहेत.