Agriculture Loan : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! ‘या’ जिल्हा बँकेकडून रब्बी हंगामात शेतकऱ्यांना 27 कोटीचे कर्ज वाटप होणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture Loan : मित्रांनो राज्यात रब्बी हंगामासाठी शेतकरी बांधव लगबग करत असल्याचे चित्र आहे. यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी मोठा कष्टाचा गेला आहे. खरीप हंगामात पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी खरीप हंगामातून शेतकऱ्यांना अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळणार असल्याचे चित्र आहे.

यामुळे शेतकरी बांधवांना रब्बी हंगामासाठी आवश्यक भांडवलाची उपलब्धता करण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. साहजिकच शेतकऱ्यांना खरीप हंगामात अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळाले असल्याने शेतकरी बांधवांना आता कर्ज घ्यावे लागणार आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे.

नाशिक जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी बँकेत मतदार असलेल्या शेतकरी बांधवांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की नाशिक जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी बँकेकडून रब्बी हंगामासाठी शेतकरी बांधवांना 27 कोटी 43 लाख रुपये दिले जाण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

दरम्यान हाती आलेल्या माहितीनुसार रब्बी हंगामासाठी आत्तापर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून दहा कोटी 25 लाखांचे कर्जवाटप शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. म्हणजेच बँकेकडून आत्तापर्यंत लक्षाॅंकाच्या केवळ 37% एवढेच रब्बी हंगामात कर्जवाटप करण्यात आले आहे.

निश्चितच नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कासवगतीने कर्जाचे वाटप केले जात आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामासाठी 39 हजार 928 हेक्टर क्षेत्रावरील 51 हजार 587 शेतकऱ्यांना 579.24 कोटींचे कर्जवाटपाचे लक्षांक निश्चित करण्यात आले आहे.

यात खरीप हंगामासाठी 551.81 कोटींचे उद्दिष्ट्य होते. यापैकी 50 हजार 650 शेतकऱ्यांना 3 नोव्हेंबर 2022 अखेर 446.82 कोटींचे कर्ज वाटप झाले आहे. दरम्यान जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून येत्या काही दिवसात कर्ज वाटपाच्या कामाला गती दिली जाणार आहे.

निश्चितच यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी आवश्यक भांडवलाची उभारणी करता येणे शक्य होणार आहे. दरम्यान सध्या रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण तयार झाले असून शेतकरी बांधवांना खरीप हंगामात झालेले नुकसान रब्बी हंगामातून भरून निघण्याची आशा आहे.