Agriculture News : ब्रेकिंग! सरकार ‘या’ शेतकऱ्यांना देणार 5 लाख, ‘या’ठिकाणी असा करा अर्ज, 30 सप्टेंबर आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News : भारतात पशुपालन व्यवसाय (Animal Husbandry) मोठ्या प्रमाणात केला जात आहे. शेती व्यवसायाच्या (Farming) अगदी सुरुवातीपासून पशुपालन व्यवसाय शेतकरी बांधवांचा उत्पन्नाचा (Farmer Income) एक अतिरिक्त स्रोत बनला आहे.

विशेष म्हणजे मायबाप शासन देखील पशुपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहे. मित्रांनो खरे पाहता शेतीशी निगडित व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसाय केला जात असल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फायदा या व्यवसायातून मिळतो.

मात्र असे जरी असले तरी देखील पालक शेतकरी बांधव आता देशी गाई आणि म्हशींच्या जाती पेक्षा इतर संकरित जातींचे पालन मोठ्या प्रमाणात करत आहेत. त्यामुळे भारतातील मूळ किंवा देशी गोवंश तसेच म्हशींच्या जाती आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. याच अनुषंगाने आता मायबाप शासनाने एक कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.

देशी गाई आणि म्हशीच्या जातींचे संवर्धन करण्यासाठी मायबाप शासनाने एक कल्याणकारी योजना (Yojana) संपूर्ण देशभरात लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता देशी गाई आणि म्हशी यांचे संवर्धन तसेच संगोपन करणाऱ्या पशुपालक शेतकरी बांधवांना प्रोत्साहित करणे हे तू मायबाप शासनाकडून एका विशेष पुरस्काराची (Farmer Scheme) सुरुवात करण्यात आली आहे.

केंद्रीय पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयातर्फे लवकरच गोपाल रत्न पुरस्कार (Gopal Ratna Award) सोहळा आयोजित केला जाणार आहे, ज्यामध्ये देशी गाय-म्हशींच्या प्रजातींचे संवर्धन-प्रोत्साहन करण्यात येणार आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून पशुपालक शेतकरी बांधवांना (Livestock Farmer) तब्बल पाच लाखांपर्यंतची पुरस्कार रक्कम देखील देण्यात येणार आहे. यामुळे देशी गाई आणि म्हशींचे संगोपन करणाऱ्या पशुपालकांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे.

तसेच यामुळे देशी गाई आणि मशीन चे संवर्धन देशात मोठ्या प्रमाणात होऊ शकणार आहे. गोपाल रत्न पुरस्कारासाठी आता मायबाप शासनाकडून पशुपालक शेतकऱ्यांचे अर्ज मागवले जात आहेत. जे पशुपालक शेतकरी बांधव देशी गोवंश तसेच म्हशींच्या जातींचे संगोपन करत असतील ते पशुपालक शेतकरी बांधव या योजनेसाठी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकणार आहेत. अशा परिस्थितीत आज आपण या योजनेविषयी किंवा पुरस्काराविषयी सविस्तर जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत.

पुरस्काराची रक्कम पाच लाख रुपये पर्यंत

गोपाल रत्न पुरस्कार हा पशुपालक शेतकऱ्यांचा गौरव करण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे. हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा पुरस्कार एकूण तीन श्रेणीमध्ये वितरित केला जाणार आहे. पहिला पुरस्कार पाच लाख रुपयाचा दुसरा पुरस्कार तीन लाख रुपयाचा आणि तिसरा पुरस्कार दोन लाख रुपयाचा असे या पुरस्काराचे स्वरूप राहणार आहे.

पुरस्काराचा उद्देश नेमका काय

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की हा पुरस्कार देशी गोवंश तसेच देशी म्हशीच्या जाती यांचे संवर्धन करण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे. याशिवाय या पुरस्काराच्या माध्यमातून देशात दुग्ध उत्पादनात वाढ करण्याचा देखील एक उदात्त हेतू दडलेला आहे. 

पुरस्कारासाठी पात्रता नेमक्या कोणत्या

मित्रांनो हा पुरस्कार राष्ट्रीय गोकुल मिशन योजने अंतर्गत सुरू करण्यात आलेला आहे. यासाठी केंद्र सरकारने काही पात्रता देखील घालून दिल्या आहेत. जे शेतकरी बांधव गाय आणि म्हशीच्या देशी जातींचे संवर्धन करतात त्यांनाचं हा पुरस्कार दिला जाणार आहे. गाईच्या पन्नास देशी प्रमाणित जाती आणि म्हशीच्या 17 देशी प्रमानित जाती यापैकी कुठल्याही एका जातीचे संवर्धन करणाऱ्या पशुपालक शेतकऱ्यांना हा पुरस्कार मिळणार आहे.

देशी गायींच्या संवर्धनासाठी प्रशिक्षित कृत्रिम रेतन तंत्रज्ञ यांना देखील हा पुरस्कार देऊ केला जाणार आहे. याव्यतिरिक्त दूध उत्पादक कंपन्या ज्या दररोज 100 लिटर दूध उत्पादन करतात त्यांनादेखील या पुरस्काराची रक्कम देऊ केली जाणार आहे. दूध सहकारी संस्थाना देखील पुरस्कार दिला जाऊ शकतो. MPC किंवा FPO शेतकरी गट देखील पुरस्कारासाठी पात्र राहणार आहेत. मात्र शेतकरी गटात 50 शेतकरी सदस्य असणे बंधनकारक राहणार आहे.

या ठिकाणी करावा लागणार आहे अर्ज

राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार अंतर्गत अर्ज करण्यासाठी, तुम्ही भारत सरकारच्या अधिकृत वेबसाइट https://awards.gov.in वर जाऊन अर्ज करू शकता. या पुरस्कारासाठी मायबाप शासनाने ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज मागवले आहेत.