Agriculture News : ब्रेकिंग ! लंपी आजाराने दगावलेल्या जनावरांसाठी दिल्या जाणाऱ्या मदतीत मोठा बदल, आता मिळणार ‘इतकी’ रक्कम

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News : गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण देशात लंपी आजारामुळे पशुधन (Animal) संकटात सापडले आहे. त्यामुळे देशातील हजारो जनावरे मृत्युमुखी पडले आहेत. या रोगाचा आपल्या महाराष्ट्रात देखील शिरकाव झाला आहे. महाराष्ट्रात देखील या आजारामुळे गुरेढोरे दगावत असल्याचे चित्र आहे.

दरम्यान या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाकडून (Government) सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. शासनाकडून या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. एवढेच नाही तर या आजारामुळे (Lumpy Skin Disease) मृत्युमुखी पडलेल्या जनावरांसाठी मदत म्हणून पशुपालक शेतकरी बांधवांना आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.

खरं पाहता, आता पर्यंत शासन ठराविक जनावरांनाच नुकसान भरपाई देत होती. मात्र आता यामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. आता पशुपालक शेतकरी बांधवांची जेवढे जनावरे लंपी या आजारामुळे (Lumpy Virus) दगावतील त्या सर्व जनावरांच्या मोबदल्यात पशुपालक शेतकरी बांधवांना आर्थिक साहाय्य (Lumpy Virus Compensation) दिले जाणार आहे.

शिवाय आतापर्यंत अल्प भूधारक तसेच अत्यल्प भूधारक पशुपालक शेतकरी बांधवांनाच लंपी आजाराने जनावरे दगावल्यास मदत मिळत होती. मात्र आता हे निर्बंध देखील शासनाकडून काढून टाकण्यात आले आहेत. आता प्रत्येक पशुपालक शेतकरी बांधवाला या आजारामुळे त्यांचे जनावरे दगावल्यास मदत मिळणार आहे. याबाबत पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी स्वतः माहिती दिली आहे.

आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करु इच्छितो की, राज्यात लंपी आजार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात या रोगाने महाराष्ट्रातील पशुधन बाधित झाले. अनेक पशुपालक शेतकरी बांधवांचे यामुळे नुकसान झाले. अशा परिस्थितीत शासनाने अल्प भूधारक तसेच अत्यल्प भूधारक शेतकरी बांधवांची जनावरे आजाराने दगावल्यास आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतला. शिवाय या निर्णयाच्या माध्यमातून एका शेतकऱ्याला केवळ तीन जनावरे पर्यंत लाभ मिळत होता.

म्हणजे एका शेतकऱ्याचे तीन जनावरे या आजाराने मृत्युमुखी पडल्यास त्या शेतकऱ्याला मोबदला मिळणार होता. मात्र त्यापेक्षा जास्त जनावरे आजाराने दगावल्यास त्याला केवळ 3 जनावरांसाठी मदत मिळणार होती बाकी दगावलेल्या जनावरांना आर्थिक मदत दिली जाणार नव्हती.

मात्र आता या निर्णयात मोठा बदल केला गेला आहे. आता अल्पभूधारक अत्यल्पभूधारक ही अट शिथिल करण्यात आली असून पशुपालक शेतकरी बांधवांची या आजाराने जेवढे जनावरे दगावतील तेवढ्या जनावरांना आता मोबदला मिळणार आहे.

किती मिळणार नुकसान भरपाई

लंपी आजाराने गाय किंवा म्हैस मरण पावल्यास तीस हजार रुपये. बैल किंवा ओढकाम करणारे जनावरे मरण पावल्यास 25000 रुपये. तसेच वासरू किंवा लहान जनावरे दगावल्यास सोळा हजार रुपये दिले जाणार आहेत. आता पशुपालक शेतकरी बांधवांची या आजारामुळे जेवढी जनावरे दगावली तेवढ्या सर्वांना भरपाई दिली जाणार आहे.