Animal Care : गाई-म्हशीसाठी घटसर्प आजार आहे घातक ! वेळेत ‘या’ पद्धतीने नियंत्रण न केल्यास पशुधन दगावण्याची शक्यता

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Animal Care : भारतात पशुपालन (Animal Husbandry) हा एक मुख्य व्यवसाय आहे. शेतीनंतर सर्वात जास्त पशुपालन (Cow Rearing) आपल्या देशात केले जाते. पशुपालन व्यवसाय शेतकऱ्यांसाठी (Farmer) निश्चितच फायद्याचा ठरतो. मात्र असे असले तरी या व्यवसायात काही गोष्टींची काळजी घेण्याचे आवाहन केले जाते.

मित्रांनो पशुपालन व्यवसायात (Animal Husbandry Business) यशस्वी होण्यासाठी जनावरांचे आरोग्य अबाधित राखणे पशुपालक शेतकरी बांधवांसाठी (Livestock Farmer) अति महत्त्वाचे ठरते. जनावरांचे आरोग्य चांगले राहिल्यास पशुपालन व्यवसायातून चांगली कमाई होत असते.

विशेषता दुधाळ जनावरांचे आरोग्य (Animal Health) चांगले राहिल्यास दूध उत्पादन क्षमता वाढत असते. मित्रांनो गाई-म्हशींना घटसर्प हा आजार देखील मोठ्या प्रमाणात होत असतो. अशा परिस्थितीत या आजारावर वेळीच नियंत्रण मिळवणे अतिशय आवश्यक राहते. हा आजार बहुधा पावसाळ्याच्या दिवसात पाहायला मिळतो मात्र इतर ऋतूमध्ये देखील हा आजार होऊ शकतो. या आजारामुळे जनावरांचे अवघ्या चोवीस तासात मृत्यू होण्याची शक्यता देखील असते.

हा एक संक्रमक आजार आहे. यामुळे या आजारावर (Animal Disease) वेळीच नियंत्रण मिळवण्याचा सल्ला जाणकार लोकांकडून देण्यात आला आहे. पाश्चरेला मलोसीडा नावाच्या जिवाणूच्या प्रादुर्भावामुळे हा आजार होतो. या आजारात जनावरांच्या वरच्या श्वसनमार्गावर वाईट परिणाम होतो.

यामुळे जनावरांना श्वसनास त्रास होतो. जनावरांची श्वसनसंस्था पूर्णपणे प्रभावित होत असल्याने श्वसनअभावी जनावरांच्या मृत्यूची शक्यता असते. अशा परिस्थितीत आज आपण घटसर्प या आजाराची लक्षणे आणि उपचार पद्धती जाणून घेण्याचा थोडक्यात पण सविस्तर प्रयत्न करणार आहोत.

घटसर्प आजाराची लक्षणे

जेव्हा हा रोग होतो तेव्हा जनावरामध्ये अनेक लक्षणे दिसतात. जसे-

  • घटसर्प या आजाराने बाधित असलेल्या जनावरांना खूप ताप येतो.
  • या आजाराने ग्रसित असलेल्या जनावरांचे डोळे लाल होऊ लागतात.
  • या आजारामुळे जनावरांना श्वास घेण्यास खूप त्रास होतो.
  • इतकंच नाही तर घटसर्प आजाराने बाधित असलेल्या जनावरांचे नाक वाहू लागते आणि जनावराला छातीत खूप वेदना होतात.

घटसर्प रोगापासून जनावरांना कसे वाचवायचे किंवा घटसर्प रोग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना

  • मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की घटसर्प आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना हाच एक सर्वात लाभदायक आणि जनावरांना वाचवण्याचा उपाय आहे. जनावरांना घटसर्प रोगाची लस पावसाळ्यापूर्वी द्यावी.
  • जनावरे स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष काळजी घ्यावी. तसेच जनावरांच्या गोठ्यात देखील स्वच्छता राखली गेली पाहिजे.
  • पावसाळ्याच्या काळात जनावरांना उघड्यावर चरायला सोडू नये.

घटसर्प आजारावरचा उपचार

घटसर्प हा अत्यंत घातक आणि संसर्गजन्य आजार आहे, अशा परिस्थितीत या आजारावर उपाययोजना करण्यात थोडा जरी वेळ वाया घालवला तरी देखील महागात पडू शकते. म्हणून, या रोगाची लक्षणे दिसताच डॉक्टरांची मदत घेण्याचा प्रयत्न करा. यावेळी पशुवैद्य प्राण्यांना प्रतिजैविक देऊ शकतात. पण तरीही या आजारातून बरे होण्याची शक्यता फारच कमी असते.