Banana Farming: शेतकऱ्यांची होणार मौज…! या जातीच्या केळीची 240 झाडे लावा, होणार 8 लाखांची कमाई

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Banana Farming: आपल्या देशात मोठ्या प्रमाणात फळबाग वर्गीय पिकांची शेती बघायला मिळते. गेल्या अनेक दशकांपासून शेतकरी बांधवांनी (farmer) उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने पारंपरिक पिकांऐवजी फळबागास प्राधान्य द्यायला सुरुवात केली आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नात भरीव (farmers income) वाढ झाली आहे. अशाच फळबाग वर्गीय पिकांपैकी प्रमुख असलेले केळीची देखील आपल्या देशात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.

आपल्या राज्यात देखील केळीची लागवड विशेष उल्लेखनीय आहे. राज्यातील खानदेश प्रांतात विशेषता जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केळीच्या बागा आपल्याला बघायला मिळतील. जळगाव जिल्ह्याच्या केळीला जीआय टॅग देखील मिळाला आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मोठा फायदा झाला आहे.

मित्रांनो आज आपण केळीच्या एका विशिष्ट जाती विषयी जाणून घेणार आहोत. आज आपण केळीच्या अशा एका जातीविषयी (banana variety) जाणून घेणार आहोत ज्याची 30 झाडे जरी लावली तरीदेखील शेतकरी बांधव लखपती बनू शकतो.

मित्रांनो आम्ही केळीच्या ज्या जाती बद्दल बोलत आहोत ती आहे लाल केळी. लाल केळीची लागवड (red banana farming) शेतकऱ्यांसाठी विशेष फायद्याची ठरणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील (aurangabad) कन्नड तालुक्याच्या एका शेतकऱ्याने लाल केळीची अवघी 60 झाडे लावली होती. या 60 केळीच्या झाडातून या युवा शेतकऱ्याला तब्बल दोन लाखांची कमाई झाली.

अशा पद्धतीने जर आपण लाल केळीची 240 झाडे लावली तर आपण जवळपास 8 लाखांची कमाई करू शकणार आहात. विशेष म्हणजे लाल केळीची एक केळी म्हणजेचं एक नग तब्बल 30 रुपयाला विकले जात आहे. यामुळे या लाल केळीची लागवड शेतकऱ्यांसाठी विशेष फायद्याची ठरणार आहे.

लाल केळीला आहे मोठी मागणी:- मित्रांनो लाल केळी( Red Banana) मानवी आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. या केळीचे नियमित सेवन केल्याने आपल्या शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढते. निश्चितच कोरूना पासून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये पौष्टिक फळांचे सेवन देखील केले जात आहे.

अशा परिस्थितीत लाल केळी सेवन करणे मानवी शरीरासाठी खूपच फायद्याचे ठरणार आहे. एवढेच नाही लाल केळी खाल्ल्याने आपल्या शरीरातील पांढऱ्या रक्त पेशी वाढण्यासाठी देखील मोठी मदत होते. लाल रंगाच्या केळीमध्ये सामान्य केळी पेक्षा जास्त पोषक घटक असल्याचा दावा केला जातो. लाल केळींमध्ये खनिजे, जीवनसत्त्वे, भरपूर फायबर( Fiber) आणि चांगले कार्बोहायड्रेट ( Carbohydrates)असतात. यामुळे लाल केळीचे सेवन आरोग्यासाठी विशेष फायद्याचे ठरते.

लाल केळीमध्ये सामान्य केळीपेक्षा अधिक प्रमाणात बीटा कॅरोटीन( Beta Cartotene) असतात. बीटा कॅरोटीनमुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्त साठून राहत नाही. निश्चितच लाल केळी खाल्ल्याने मानवी शरीराला अनन्यसाधारण असे फायदे होतात.

यामुळे या लाल केळीला बारामाही बाजारपेठेत चांगली मागणी असते शिवाय या लाल केळीला इतर केळी पेक्षा अधिक दर देखील मिळतो. निश्चितच लाल केळीची शेती शेतकऱ्यांसाठी फायद्याचा सौदा ठरणार आहे.