Chilli Farming : ऐकलं व्हयं! मिरचीच्या या 5 सुधारित जातींची शेती करा, कीटक-रोगांचा प्रादुर्भाव होणारं नाही, उत्पादनही चांगले मिळते

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Chilli Farming : मित्रांनो भारत हा मसाल्यांचा देश म्हणून ओळखला जातो. आपल्या देशात मसाल्याची लागवड आणि वापर दोन्ही लक्षणीय आहे. मिरचीचा (Chilli Crop) वापर जेवणाची चव तसेच तिखटपणा वाढवण्यासाठी आपल्या भारतात मोठ्या प्रमाणात केला जातो.

मित्रांनो हिरव्या मिरचीमध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आढळतात. त्यामुळे हिरव्या मिरचीला बाजारात मोठी मागणी असते. अशा परिस्थितीत हिरव्या मिरचीची शेती (Green Chilli Farming) शेतकऱ्यांसाठी फायद्याचा सौदा सिद्ध होऊ शकते. विशेष म्हणजे आपल्या देशात हिरव्या मिरचीची शेती विशेष उल्लेखनीय आहे. आपल्या राज्यातही हिरव्या मिरचीची लागवड केली जाते.

हिरव्या मिरचीची वाढती मागणी पाहता याची शेती (Farming) आपल्यासाठी निश्चितच फायद्याचा सौदा ठरणार आहे. मात्र असे असले तरी जाणकार लोक शेतकरी बांधवांना (Farmer) हिरव्या मिरचीचा सुधारित जातींची लागवड करण्याचा सल्ला देतात. अशा परिस्थितीत आज आपण मिरचीच्या काही सुधारित जाती (Chilli Variety) हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.

मिरचीचे सुधारित वाण

ICAR-भारतीय फलोत्पादन संशोधन संस्था, बंगलोर यांनी मिरचीच्या 5 सुधारित जाती विकसित केल्या आहेत, अर्का तेजस्वी, अर्का यशस्वी, अर्का सानवी, अर्का तन्वी आणि अर्का गगन. कोरड्या/लाल मिरचीसाठी अर्का तेजस्वी आणि अर्का यशस्वी चांगलेवाण आहे. तर अर्का गगन हे हिरव्या मिरचीच्या उत्पादनासाठी चांगले आहे. तर अर्का तन्वी आणि अर्का सानवी या दोन्ही हिरव्या आणि कोरड्या मिरच्यांच्या उत्पादनासाठी अधिक योग्य आहेत.

मिरचीच्या सुधारित जातींचे वैशिष्ठ्य

अर्का गगन जातीची मिरची मध्यम आकाराची असून ते एकरी 80 ते 100 क्विंटल उत्पादन देऊ शकतात.

अर्का तन्वी 100 क्विंटल हिरवी मिरची आणि 30-35 क्विंटल कोरडी मिरची प्रति एकर उत्पादन देखील करू शकते.

अर्का सानवी 100 क्विंटल हिरवी मिरची आणि 30-35 क्विंटल कोरडी मिरची प्रति एकर उत्पादन देखील करू शकते.

अर्का तेजस्वी आणि अर्का यशस्वी 30-35 क्विंटल कोरडी मिरची प्रति एकर उत्पादन देऊ शकतात.

रोगमुक्त मिरचीचे वाण

मिरचीच्या या सर्व जाती अनेक रोगांपासून सुरक्षित आहेत म्हणजेच शेतकऱ्यांना यापुढे कीड आणि रोगांमुळे पिकाचे नुकसान होण्याची भीती राहणार नाही आणि उत्पादनही चांगले मिळेल. मिरचीच्या या सुधारित जाती पानांच्या कर्ल रोगापासून देखील संरक्षित आहेत, जो विषाणूमुळे होतो. या रोगामुळे मिरचीची पाने मुरडून पिवळी पडतात. पाने देखील आकाराने लहान होतात आणि झाडाचा पूर्ण विकास होत नाही.

या रोगामुळे मिरची उत्पादकांना दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत होते, परंतु आता असे होणार नाही कारण आयसीएआर-भारतीय फलोत्पादन संशोधन संस्था, बंगलोर यांनी विकसित केलेल्या मिरचीच्या पाचही सुधारित जाती लीफ कर्ल प्रतिरोधक आहेत. यामुळे शेतकऱ्यांनाही कीटकनाशकांचा वापर कमी करावा लागणार आहे. अशा प्रकारे लागवडीचा खर्च कमी होऊन नफा वाढेल.