Cotton Farming: कापुस उत्पादक शेतकऱ्यांनो अमावस्याला ‘हे’ एक काम करा आणि गुलाबी बोंड आळीचा नायनाट मिटवा; वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Farming: भारतात सर्वत्र कापूस लागवड (Cotton Cultivation) मोठ्या प्रमाणात केली जाते. राज्यात देखील शेतकरी बांधव (Farmer) मोठ्या प्रमाणात कापसाची शेती करत असतात. राज्यात मराठवाडा विदर्भ आणि खानदेश मध्ये मोठ्या प्रमाणात कापसाची शेती (Farming) केली जाते.

एवढेच नाही तर कापूस (Cotton) लागवड पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात देखील बघायला मिळते. राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील (Kharif Season) कापूस या मुख्य पिकावर आपले सर्व अर्थकारण अवलंबून असते.

मात्र असे असले तरी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना (Cotton Grower Farmer) अलीकडील काही वर्षात गुलाबी बोंड अळीमुळे (Pink Bollworm) मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. परिणामी गेल्या काही वर्षात कापसाचे क्षेत्र देखील कमी झाले आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, गुलाबी बोंड अळी कापसाच्या बोंडमधील सरकी खात असल्याने व आपली विष्ठा बोंडमध्येच सोडत असल्याने कपाशीची गुणवत्ता खराब होते. शिवाय गुलाबी बोंड आळी मुळे कापसाच्या पूर्ण पाकळ्या न उमलने, कवडी कापूस होणे, कापूस हलका भरणे इत्यादी समस्यांना कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागते.

यामुळे कापसाच्या उत्पादनात भलीमोठी घट बघायला मिळते परिणामी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट होते. हेच लक्षात घेता आज आपण गुलाबी बोंड अळी वर प्रभावी नियंत्रण कसे मिळवले जाऊ शकते याविषयी जाणून घेणार आहोत.

गुलाबी बोंड आळी वर या पद्धतीने मिळवा नियंत्रण 

मित्रांनो गुलाबी बोंड अळीचे संकट टाळण्यासाठी कापूस डिसेंबर महिन्यानंतर शेतातून काढून टाकणे अतिशय महत्त्वाचे ठरते. म्हणजेच शेतकरी बांधवांनी कापसाचे फरदड उत्पादन टाळावे. कापूस शेतातून बाहेर काढल्या नंतर शेताची खोल नांगरट करावी. या उपाययोजना केल्या तर कोषावस्थेतील किडीवर प्रभावी नियंत्रण मिळवता येणे शक्य होते.

मित्रांनो कृषी तज्ञांच्या मते, गुलाबी बोंड आळीचे पतंग साधारणपणे कापूस लागवडीनंतर 30 ते 40 दिवसांनी कोषातून बाहेर पडतात व पाते, फुले यावर अंडी घालतात. यामुळे गुलाबी बोंडआळी वर नियंत्रण ठेवण्यासाठी कापूस लागवडी नंतर लगेचच उपाययोजना कराव्या लागतात.

कारण की एकदा अंड्यातून आळया बाहेर पडल्या की त्या बोंडात प्रवेश करून सरकी चे नुकसान करतात. शिवाय गुलाबी बोंड अळी एकदा बोंडात घुसली की बाहेरून फवारलेले औषध फारसे प्रभावी ठरत नाही. यामुळे गुलाबी बोंड अळीमुळे कापसाचे नुकसान अटळ ठरते. परिणामी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हजार रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागतो.

शिवाय जमीन नापीक होण्याचा धोका देखील कायम असतो. यामुळे कापूस लागवड केल्यानंतर साधारणपणे 45 दिवसांच्या आसपास गुलाबी बोंड आळी वर नियंत्रण मिळवण्यासाठी खाली सांगितलेल्या पर्यायाचा आपण निश्चितच वापर करू शकता आणि गुलाबी बोंड आळी वर प्रभावी नियंत्रण मिळवू शकता.

»मित्रांनो गुलाबी बोंड आळी वर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतात चहूकडे कामगंध सापळे लावावे असा सल्ला कृषी क्षेत्रातील जाणकार लोक देत असतात. कृषी तज्ञांच्या मते, एकरी 5 ते 7 कामगंध सापळे (Pheromone traps) लावल्याने गुलाबी बोंड आळी वर प्रभावी नियंत्रण मिळवता येणे शक्य होते. कामगंध सापळ्यात नर पतंग अडकतात आणि या अळीचे प्रजनन कमी होते परिणामी गुलाबी बोंड आळी कापसावर कमी अटॅक करते. यामुळे कापसाच्या उत्पादनात घट होत नाही परिणामी कापसाच्या पिकातून चांगले उत्पन्न शेतकऱ्यांना मिळते.

» कृषी तज्ञांच्या मते गुलाबी बोंड आळी वर रासायनिक पद्धतीने नियंत्रण मिळवण्यासाठी पोळ्याच्या आमावस्येच्या आसपास अंडीनाशक औषधी प्रोफेनोफॉस (क्यूराक्रॉन किंवा प्रोफेक्स) फवारणी करावी. यामुळे गुलाबी बोंड अळीचा अंड्यातचं नायनाट होतं असल्याचा दावा केला जातो. खरं पाहता अमावस्याच्या रात्री फवारणी करण्यामागे एक शास्त्रीय कारण आहे बोंडआळीच्या नर मादी प्रजनन हे अंधाऱ्या रात्री सर्वोच्च होते म्हणून पोळ्याच्या अमावस्येला ही फवारणी केली तर गुलाबी बोंड आळीचे कायमचा नायनाट केला जाऊ शकते.

»शेतकरी मित्रांनो कृषी तज्ञांच्या मते, कापसाचे पीक 60-70 दिवसांचे झाल्यावर बोंडआळीची पुढची पिढी पुन्हा जोमाने हल्ला करण्यास तयार होते, त्यावेळी देखील या औषधाची दुसरी फवारणी करावी. यामुळे गुलाबी बोंड आळी वर प्रभावी नियंत्रण मिळवता येणे शक्य असल्याचा दावा केला जातो.