Cotton Farming Tips : कापसाला सोन्याचा भाव..! पण कापूस पिकात गुलाबी बोंड अळीचा धोका कायम, असे करा व्यवस्थापन, नाहीतर…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Farming Tips : राज्यातील शेतकरी बांधव (Farmer) खरीप हंगामात (Kharif Season) कापसाची (Cotton Crop) मोठ्या प्रमाणात शेती करतात. कापूस हे खरीप हंगामातील एक मुख्य पीक आहे. कापूस पिकाला नगदी पिकाचा (Cash Crop) दर्जा प्राप्त आहे.

अशा परिस्थितीत या पिकाची शेती राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधवांच्या अर्थकारणात महत्त्वाचा वाटा राखत असते. राज्यात कापसाची शेती (Cotton Cultivation) खानदेश मध्ये सर्वाधिक बघायला मिळते. विशेषतः जळगाव जिल्ह्यात कापूस लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. खानदेश व्यतिरिक्त पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात कापसाची शेती बघायला मिळते.

याशिवाय राज्यातील मराठवाडा तसेच विदर्भात देखील कापसाची लागवड विशेष उल्लेखनीय आहे. मित्रांनो खरे पाहता कापूस हे एक हमीचे पीक असले तरीदेखील या पिकावर गुलाबी बोंड आळी (Pink Bollworm) दरवर्षी मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. गत वर्षी कापसाला सोन्यासारखा बाजार भाव मिळाला असल्याने कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनी (Cotton Grower Farmer) कापसाचे फरदड उत्पादन अधिक प्रमाणात घेतले.

अशा परिस्थितीत कापूस पिकासाठी घातक ठरणाऱ्या गुलाबी बोंड आळी साठी पोषक वातावरण तयार झाल्याचे जाणकार नमूद आहेत. त्यामुळे यावर्षी कापूस पिकावर गुलाबी बोंड अळी अधिक प्रमाणात आक्रमण करत असल्याचे समजत आहे. दरम्यान गणेश चतुर्थीच्या दिवशी जळगाव जिल्ह्यात कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. या ठिकाणी कापसाला कधी नव्हे तो तब्बल 16 हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा बाजार भाव (Cotton Rate) मिळाला.

अशा परिस्थितीत या वर्षी कापूस उत्पादक शेतकरी बांधवांची चांदी होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र असे असले तरी कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना कापसासाठी घातक ठरणाऱ्या गुलाबी बोंड अळीचे (Cotton Pink Bollworm) वेळीच नियंत्रण मिळवावे लागणार आहे.

त्यामुळे आज आम्ही देखील आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी कापूस यावर येणाऱ्या गुलाबी बोंड अळीवर कशा पद्धतीने नियंत्रण (cotton pest management) मिळवायचे याविषयी बहुमूल्य माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.

गुलाबी बोंड अळी नेमकी कापूस पिकाला कशा प्रमाणे क्षती पोहोचवते:-

जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार गुलाबी बोंड अळी कापूस पिकाचे खोड, फांद्या, पानांचा रस शोषून कापसाच्या झाडांना अशक्त बनवते. गुलाबी बोंड आळी सुरवातीला कापसाचे पाने, फुले व काळ्या यावर आपली उपजीविका भागवत असते. नंतरच्या काळात गुलाबी बोंड अळी कापसाचे फुले किंवा बोंडे यांना बारीक छिद्र करून आत शिरते.

कापसाच्या बोंडात आत शिरल्यानंतर आतील भागावर गुलाबी बोंड अळी आपली उपजीविका भागवते. यामुळे प्रादुर्भावग्रस्त कापसाची पाती व कापसाची बोंडे गळून पडतात. या किडीच्या प्रादुर्भावामुळे कापसाची फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात.

जाणकार लोकांच्या मते, कापसाच्या बोंडात शीरलेली अळि बियांना छिद्र करून सरकी खाते. त्यामुळे रुईची प्रत खराब होते तसेच सरकीतील तेलाचे प्रमाण देखील कमी होते. निश्चितच या गुलाबी बोंड आळी वर वेळीच नियंत्रण मिळवले तर कापसाच्या उत्पादनात घट होणार नाही अन्यथा कापसाच्या उत्पादनात भली मोठी घट होऊ शकते.

गुलाबी बोंड अळी कीटकाचे व्यवस्थापन कसं करणार बर (cotton pink bollworm management)

मित्रांनो गुलाबी बोंड आळी वर नियंत्रण ठेवण्यासाठी शेतकरी बांधवांना कडुनिंबाच्या तेलाची फवारणी करण्याचा सल्ला दिला जातो. जाणकार लोकांच्या मते कडुनिंबाच्या तेलाची फवारणी केल्यास या किटकांचा प्रादुर्भाव टाळता येतो.

मात्र गुलाबी बोंड आळी किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कापूस पिकावर बघायला मिळाल्यास शेतकरी बांधवांना प्रोफेनोफोस फवारणी करण्याचा सल्ला देतात. जाणकार लोकांच्या मते दोन एकर कापूस पिकासाठी प्रोफेनोफोस 1000 मिली 300 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

याशिवाय या गुलाबी बोंड अळी किटकाचा प्रादुर्भाव तातडीने कमी करण्यासाठी प्रोफेनोफोस 50 ईसी 200 मिली अधिक 5 टक्के तीव्रतेचे निंबोळी अर्क हे 200 मिली प्रती 100 लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी.

मित्रांनो येथे दिलेली माहिती ही कोणत्याही परिस्थितीत अंतिम राहणार नाही. कोणत्याही पिकावर कोणत्याही औषधाची फवारणी करण्याअगोदर कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांचा तसेच कृषी सेवा केंद्र चालक यांचा सल्ला घेणे अपरिहार्य राहणार आहे.