ड्रोनने पिकांवर फवारणी करायची आहे का? किती लागेल त्यासाठी खर्च? वाचा ए टू झेड माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कृषी क्षेत्रामध्ये आता मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून यामध्ये अनेक प्रकारच्या यंत्रांचा वापर देखील केला जात आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा या दोन्हींमध्ये मोठ्या प्रमाणावर बचत तर होतेच परंतु तंत्रज्ञानाच्या वापराने पिक उत्पादन वाढीला देखील हातभार लागत आहे.

शेतीचा विचार केला तर शेतीमध्ये अनेक अर्थाने आपल्याला व्यवस्थापन करावे लागते व यामध्ये खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन यांना पीक उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे. त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पिकांवर कुठल्याही प्रकारचे कीड व रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता किड व रोग व्यवस्थापनाला अनन्यसाधारण महत्त्व असून यामध्ये पिकांवरील रासायनिक निविष्ठांची फवारणी हे एक महत्त्वाचे काम आहे.

कीटकनाशक हे पीक रोग किड व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची निविष्ठा असून जर आपण सध्याच्या कीटकनाशक फवारण्याची पद्धत पाहिली तर ती स्वयंचलित किंवा ट्रॅक्टर वर बसवलेल्या फवारणी यंत्राच्या साह्याने करण्यात येते. परंतु याचा आपल्याला फायद्यापेक्षा नुकसान होताना जास्त दिसते. कारण या पारंपारिक पद्धतीमध्ये कीटकनाशक व पाण्याचे प्रमाण जास्त वापरले जाते व फवारणीचा बराच भाग पर्यावरणात वाया जातो.

तसेच पिकावर सारख्या प्रमाणात फवारणी करता येत नाही किंवा फवारणी करणाऱ्याचा कीटकनाशकांची संपर्क येऊन जीवावर बेतण्याची शक्यता देखील असते. तसेच उत्पादनावर बऱ्याचदा अनावश्यक असलेल्या रसायनांचा थर देखील साचतो व मातीचे प्रदूषण तसेच कीटकनाशकांवर देखील जास्त खर्च होतो.

त्यामुळे मनुष्यबळाची गरज व लागणारे कीटकनाशकांचे प्रमाण कमी करता यावे व.सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रसायनांच्या संपर्कात व्यक्ती येऊ नये यापासून बचाव करण्याकरिता आता पीक संरक्षणासाठी आवश्यक असलेल्या कीटकनाशकांच्या वापरासाठी ड्रोनचे महत्व खूप महत्त्वाचे आहे. ड्रोन हे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे साधन मानले जात असून कृषीनिविष्ठांची कार्यक्षमता व शेतकऱ्यांची सुरक्षितता त्या दृष्टिकोनातून व उत्पादन खर्च कमी करण्याच्या बाबतीत देखील ड्रोन महत्त्वाचे आहे.

 ड्रोन फवारणीचे खर्चाचे स्वरूप कसे आहे?

यामध्ये जर आपण ड्रोन फवारणीचे अर्थकारण किंवा खर्चाचा विचार केला तर फवारणी ड्रोन पाच लिटर क्षमतेचे पाच लाख रुपये, फवारणी ड्रोन दहा लिटर क्षमतेचे सात लाख रुपये, फवारणी नोजल ची संख्या दोन आणि चार व फवारणीचे रुंदी तीन मीटर, फवारणीची उंची एक ते दोन मीटर म्हणजेच (पिकांची उंची पासून), फवारणीचा वेग हा तीन ते सहा मीटर प्रति सेकंद, प्रति तासाला 3.6 हेक्टर क्षेत्राची फवारणी वरून जर आपण फवारणीचा खर्च प्रति एकर पाहिला तर तो

( फवारणीचा खर्च 30 टक्के प्रति एकर नफा( रुपये)- 1014 रुपये प्रति हेक्टर म्हणजेच रुपये 407 रुपये प्रति एकरला खर्च आहे.)

** सध्या वापरत असलेल्या पारंपारिक पद्धतीने फवारणीचा सध्याचा अंदाजित खर्च

जर तुम्ही मॅन्युअल फवारणी करत असाल तर 400 ते 500 रुपये, एचटीपी स्प्रेयर 450 रुपये, बुम स्प्रेयर साडेतीनशे ते चारशे रुपये, ब्लोअर साडेचारशे ते पाचशे रुपये आणि ड्रोन 407 रुपये इतका प्रति एकर खर्च येतो.

यावरून आपल्याला दिसून येते की परंपरागत पद्धतीपेक्षा ड्रोनची फवारणी ही परवडणारी आहे. तसेच आपल्याकडे जमिनीचे तुकडीकरण झाले असल्यामुळे वैयक्तिक फवारणी करिता ड्रोन वापरणे परवडण्यासारखे नाही.त्यामुळे भाडेतत्त्वावर जर फवारणी चालवली तर ते फायद्याचे ठरणार आहे व यातून रोजगार देखील निर्माण होण्यास मदत होणार आहे.