डेरिंग केली पण वाया नाही गेली!! सफरचंद लागवड करून तर बघू असं म्हणतं केला श्रीगणेशा आणि आज ठरला सक्सेसफुल…..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2022 Apple Farming :- शेतकरी बांधव नेहमीच शेतीमध्ये वेगवेगळे नावीन्यपूर्ण प्रयोग करत असतात. अनेकदा त्यांचा हा प्रयोग फसत असतो, यामुळे त्यांचे मनोबल खच्ची होत असते.

मात्र असे असले तरी अनेक शेतकऱ्यांचे (Farmer) नवीन आणि डेरिंगबाज प्रयोग यशस्वी देखील होत असतात. शेतीमध्ये बदल करणे आता काळाची गरज बनली आहे.

आता शेतकरी बांधव देखील या गोष्टीचे समर्थन करत असून शेतीमध्ये बदल करायला पुढे सरसावत आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांना आता फायदा देखील होऊ लागला आहे.

याचेच एक उत्तम उदाहरण समोर आल आहे ते मराठवाड्यातून. मित्रांनो जसे की आपणास ठाऊक आहे सफरचंद (Apple Crop) हे थंड हवामानातील पीक आहे.

याची लागवड कश्मीर आणि हिमाचल प्रदेश सारख्या थंड प्रदेशात केली जाते. त्या ठिकाणी सफरचंद पिकातून (Apple Farming) चांगले उत्पादन देखील शेतकरी बांधव मिळवत असतात.

मात्र जर आपण मराठवाड्यात सफरचंद लागवडीचा (Cultivation of apples) विचार केला तर! कदाचित मराठवाड्यात सफरचंद लागवडीचा विचारच आपल्याला पटणार नाही.

मात्र मराठवाड्यातील एका अवलिया शेतकऱ्याने लावून तर बघू जे होईल ते…! असं म्हणत सफरचंद शेतीचा श्रीगणेशा केला आणि आज तो शेतकरी सफरचंद लागवडीत यशस्वी ठरला आहे.

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याच्या मौजे केळसांगवी येथील एका अवलिया शेतकऱ्याने हिमाचल प्रदेशमधून सफरचंदाची रोपे आणून एक एकर क्षेत्रात सफरचंदाची बाग फुलवली आहे.

याकामी त्यांना सोशल मीडियाचा आधार मिळाला कृषी विभागाचा सल्ला न घेता या अवलिया पट्ट्याने सोशल मीडियाचा सहारा घेत सफरचंदाची बाग यशस्वी करून दाखविण्याची किमया साधली आहे. मराठवाड्यात सफरचंदाची यशस्वी शेती करून दाखवणाऱ्या अवलिया शेतकऱ्याचे नाव आहे भाऊसाहेब मोहन घुले.

भाऊसाहेब यांचे वावर महामार्गालगत आहे ते गेल्या अनेक वर्षांपासून शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करीत आले आहेत. ते आपल्या शेतात डाळिंब व लिंबू फळबाग पिकांची लागवड करतात तसेच हंगामी पिके देखील ते उत्पादित करत असतात. मात्र काहीतरी हटके करायचं हा विचार कायम या अवलियाच्या डोक्यात असायचा.

असंच सोशल मीडिया हाताळताना भाऊसाहेब यांना एके दिवशी पुण्यातील एका शेतकऱ्याची सफरचंदाची बाग नजरेस पडली. याचा त्यांनी पूर्ण मागोवा घेतला त्यानंतर सोशल मीडियाचाच सहारा घेतला आणि सफरचंद शेतीची ए टू झेड माहिती मिळवली.

सोशल मीडिया मधून घेतलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी सफरचंदाची बाग लावली. सन 2020 मध्ये यावली या शेतकऱ्याने हिमाचल प्रदेशमधून सफरचंदाची सुमारे 350 रोपे आणली. एक रोपं 200 रुपयाला म्हणजेच 70 हजार रुपयांची रोपे आणली. सफरचंद रोपांची दहा बाय दहा या अंतरावर लागवड केली.

लागवड केल्यानंतर या अवलिया शेतकऱ्याने पाण्यासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा वापर केला. तरीदेखील मराठवाड्यातील प्रचंड ऊन काही सफरचंदाची रोपे सहन करू शकले नाही आणि सुमारे 120 सफरचंदाची रोपे जळाली. मात्र तरीदेखील भाऊसाहेब यांनी हार मानली नाही आणि उर्वरित रोपांची तळहातावरच्या फोडाप्रमाणे जोपासना केली.

सध्या त्यांच्या वावरात 200 सफरचंदाची रोपे बहरली आहेत. एका झाडाला त्यांच्या म्हणण्यानुसार 40 ते 50 फळे लगडली आहेत.

भाऊसाहेब यांच्या मते, एक फळ 100 ग्रॅम च्या प्लस आहे. जूनमध्ये या फळांची विक्री केली जाणार आहे. सफरचंदाच्या एक एकर क्षेत्रातील बागेसाठी भाऊसाहेब यांना आतापर्यंत 1 लाख 20 हजार रुपयांचा खर्च आला आहे.

मात्र, यातून त्यांना दोन टन सफरचंदाचे उत्पादन मिळण्याची आशा आहे. एकंदरीत मराठवाड्यासारख्या प्रदेशात थंड हवामानाचे पीक कृषी विभागाचा सल्ला न घेता यशस्वी उत्पादित करून दाखवणे खरंच डेरिंगबाज काम आहे.

म्हणून तर आम्ही म्हटलं डेरिंग केली पण वाया नाही गेली निश्चितच भाऊसाहेब यांची डेरिंग वाया गेलेली नाही आणि त्यांना यातून चांगला बक्कळ नफा मिळणार आहे.