टोमॅटोने आणली शेतकऱ्यांच्या जीवनात लाली! ‘या’ एकाच गावातील 12 शेतकरी बनले कोट्याधीश तर 55 लखपती,वाचा माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कांदा आणि टोमॅटो या पिकांचा जर विचार केला तर बाजारभावाच्या बाबतीत शेतकऱ्यांची कायमच ओरड असते. बऱ्याचदा बाजार भाव इतका कमी मिळतो की यामधून वाहतूक खर्च देखील निघत नाही व शेतीमाल बऱ्याचदा रस्त्यात फेकून द्यायची वेळ येते. परंतु पाच ते सहा वर्षाच्या  खंडानंतर बऱ्याचदा कांदा असो किंवा टोमॅटो या पिकांना उच्चांकी असा दर मिळतो. तेव्हा मात्र प्रत्येक वर्षी आर्थिक फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मात्र आर्थिक संकटातून बाहेर काढण्याची क्षमता देखील या पिकांमध्ये आहे.

अगदी तीच बाब यावर्षी टोमॅटोच्या बाबतीत दिसून येत आहे. कधी नव्हे एवढा उच्चांकी दर यावर्षी टोमॅटोला मिळत असून  तीच टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या कामाचे चीज झाल्याचे सध्या चित्र आहे. शेतकऱ्यांचा विचार केला तर नैसर्गिक आपत्तीमुळे आधीच पिचलेला शेतकरी बाजार भाव कमी मिळाल्यामुळे  आणखीनच आर्थिक कर्जबाजारीपणाच्या खाईत लोटला जातो. परंतु यावर्षी टोमॅटो ने बऱ्याच शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्यास मदत केली हे मात्र निश्चित. अशीच एक दिलासादायक बाब ही नाशिक जिल्ह्यातील धुळवड या गावाच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत घडून आली.

 कर्जात बुडालेल्या धुळवड गावच्या शेतकऱ्यांना टोमॅटो दिला दिलासा

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, नाशिक जिल्ह्यात असलेल्या धुळवड या गावच्या शेतकऱ्यांना टोमॅटो ने अक्षरशः करोडपती ते लखपती बनवले असून कर्जाच्या खाईत लोटल्या गेलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे महत्त्वपूर्ण काम टोमॅटोमुळे घडले आहे. जर आपण या गावच्या शेतकऱ्यांचा विचार केला तर डोंगरी भागामध्ये असलेल्या या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी जेसीबी व पोकलेन यंत्रांच्या साह्याने अक्षरशः टेकड्यांचे सपाटीकरण केले व त्यामध्ये उपजाऊ माती तसेच मुरूम टाकून लाखो रुपयांचा खर्च करत जमिनी तयार केल्या.

या प्रकारची जमीन ही पाण्याचा सहज नीचरा होणारी असल्यामुळे या ठिकाणचे शेतकरी प्रामुख्याने कोथिंबीर तसेच मेथी व कोबी यासारख्या पालेभाज्या व टोमॅटो आणि कांदा इत्यादी पिके घेतात. अशा प्रकारच्या मुरमाड जमिनीमध्ये या ठिकाणचे शेतकरी टोमॅटो पीक हे गेल्या कित्येक वर्षापासून मुख्य पीक म्हणून घेत आहे. परंतु दरवर्षीचा विचार केला तर एका एकर मध्ये लाखो रुपये खर्च करून देखील 200 ते 500 रुपये तर कधी कधी पन्नास ते शंभर रुपये क्रेट या दराने या ठिकाणच्या शेतकऱ्यांना टोमॅटो विकावा लागला आहे हे देखील तेवढे सत्य आहे.

या ठिकाणचे शेतकरी हे खचून न जाता त्यांनी टोमॅटो लागवडीमध्ये सातत्य ठेवले व यावर्षी या त्यांच्या कष्टाचे चीज झाले. यावर्षी या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी 2000 ते 2200  क्रेट पर्यंत टोमॅटो विकला व काही शेतकऱ्यांना त्यामुळे एकरी दहा ते बारा लाखांचे तर काही शेतकरी बंधूंना सात ते आठ लाखांचे उत्पन्न मिळाले. यावर्षी जर आपण मार्च ते एप्रिल या दरम्यान टोमॅटोचे दर पाहिले तर ते कवडीमोल असे होते.

परंतु तरीदेखील या गावच्या 125 शेतकऱ्यांनी हिम्मत दाखवली व सहाशे एकर क्षेत्रात टोमॅटो लागवड केली. एका एकरसाठी एक एक लाख रुपयांच्या पुढे खर्च करून टोमॅटोचे उत्पादन घेतले परंतु सुरुवातीला शंभर रुपयाचा दर मिळत होता. वीस किलोच्या क्रेटला 150 ते 200 रुपये दर मिळाला.

परंतु आता दोन हजार रुपये क्रेट या बाजारभावाने टोमॅटो विकला जात असून त्याचाच परिणाम म्हणून या ठिकाणाचे बारा शेतकरी कोट्याधीश बनले तर 55 शेतकऱ्यांनी 50 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. अनेक छोटे मोठे शेतकरी देखील लखपती झाले असून गेल्या आठ ते दहा वर्षापासून टोमॅटो पिकात सातत्याने नुकसान सहन केलेल्या शेतकऱ्यांना  यावर्षी त्यांच्या कष्टाचे फळ मिळाले त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या डोक्यावरचा कर्जाचा बोजा कमी झाला.