डॉक्टर साहेब मानलं रावं ! डॉक्टरी पेशा सांभाळत सुरु केली शेती ; आंबा, झेंडू, सिताफळ पिकातून कमवलेत लाखों

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Success Story : शेतीमध्ये सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने आता शेतकरी शेती नको रे बाबा असा ओरड करत आहेत. विशेष म्हणजे नवयुवक शेतकरी पुत्र देखील आता चांगलं उच्च शिक्षण घेऊन नॅशनल कंपनीत किंवा सरकारी नोकरदार म्हणून नोकरी करण्याचे स्वप्न पाहू लागले आहेत.

मात्र असे असले तरी देशात असेही अनेक सुशिक्षित लोक आहेत जे नोकरी सोबतच शेती करून चांगली कमाई करत आहेत. पुणे जिल्ह्यातील शिरूर कासार येथे देखील एका अवलिया डॉक्टरांनी आपला डॉक्टरी पेशा सांभाळत शेतीमध्ये उल्लेखनीय अशी कामगिरी करून दाखवली आहे.

सुनील कासुळे असे या डॉक्टरांचे नाव असून त्यांनी आपल्या कासळवाडी येथील शेतात पारंपारिक शेतीसोबतच केशर आंबा, खरबूज, सीताफळ यांसारख्या बागायती पिकांची लागवड केली आहे.

विशेष म्हणजे रासायनिक खतांचा दुष्परिणाम पाहता त्यांनी सेंद्रिय खत वापरले आहे. आपल्या दीड एकर शेत जमिनीत त्यांनी सिताफळ लागवड केली असून यापासून त्यांना उत्पादन मिळायला सुरुवात झाले आहे. सिताफळाच्या पिकातून त्यांना तीन साडेतीन टन उत्पादन मिळाले असून दोन लाखांपर्यंतची कमाई झाली आहे.

याशिवाय दोन एकरात केशर आंबा लागवड करण्यात आली आहे. यामध्ये त्यांनी आंतरपीक म्हणून खरबूज आणि झेंडूचे उत्पादन देखील घेतले आहे. यातूनही त्यांनी दीड लाखांची कमाई केली आहे. म्हणजेच डॉक्टरी पेशा सांभाळत शेती व्यवसाय देखील फायद्याचा बनवला आहे.

त्यांनी आपल्या उर्वरित क्षेत्रात सोयाबीन गहुतुर कापूस यांसारख्या पारंपारिक पिकांचे देखील शेती सुरूच ठेवले आहे. यातून देखील त्यांना चांगली कमाई होत आहे. निश्चितच डॉक्टर साहेबांनी शेतीमध्ये केलेली ही कामगिरी इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरक ठरणार आहे. जे नवयुवक शेतकरीपुत्र शेती ऐवजी नोकरीला प्राधान्य देतात त्यांच्यासाठी देखील हा एक आरसा आहे.

जर शेतीमध्ये योग्य नियोजन आखलं, पारंपारिक शेती सोबतच बागायती पिकांची लागवड केली तर निश्चितच शेती हा तोट्यात जाणारा व्यवसाय ठरणार नाही. यातून चांगली कमाई होऊ शकते. हीच गोष्ट डॉक्टर सुनील कासुळे यांनी सिद्ध केली आहे. यामुळे तरुणाईला एक वेगळा आदर्श लाभला आहे एवढे नक्की.