Farmer Success Story: युट्युबवरून माहिती घेत ओसाड जमिनीत फुलवली ‘या’ जातीच्या पेरूची बाग! मिळत आहे लाखोत उत्पन्न

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Success Story:- आजकाल आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियाचा वापर करतो. परंतु या सोशल मीडियाचा आपल्याला कशा पद्धतीने उपयोग करून घेता येईल हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून असते. सोशल मीडियामध्ये प्रामुख्याने फेसबुक किंवा इन्स्टा आणि youtube चा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. परंतु युट्युबचा यामध्ये विचार केला तर अनेक प्रकारची माहिती आपल्याला अनेक चॅनेलच्या माध्यमातून घरबसल्या मिळते.

युट्युबला जर ज्ञानाचा समृद्ध सागर म्हटले तरी वावगे ठरणार नाही. फक्त त्याचा वापर आपल्या फायद्यासाठी कसा करून घेता येईल याला खूप महत्त्व आहे. या दृष्टिकोनातून आपण अनेक  व्यक्ती पाहतो की त्यांनी यूट्यूबच्या मदतीने अनेक गोष्टी शिकून त्या आत्मसात करून स्वतःच्या अर्थार्जनाचे साधन निर्माण केले आहे व याला शेती क्षेत्र देखील अपवाद नाही.

अनेक शेतकरी बंधू वेगवेगळ्या पिकांची लागवड किंवा त्यांचे व्यवस्थापन याविषयीची माहिती अनेक युट्युब  चॅनलच्या माध्यमातून घेऊन त्या पद्धतीने सगळे नियोजन करून भरघोस उत्पादन मिळवण्यात यशस्वी झाल्याचे आपल्याला दिसून येते. अगदी याच पद्धतीने राजस्थान राज्यातील नागौर येथील शेतकऱ्याने यूट्यूबच्या मदतीने तैवान पिंक पेरूची लागवड करून लाखात उत्पादन घेतले आहे.

 तैवान पिंक पेरूने दिले लाखात आर्थिक उत्पन्न

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, राजस्थान राज्यातील नागौर  या ठिकाणाच्या खिनावसार हा परिसर तसा पाहिला तर वाळूने आच्छादित  म्हणजेच वालुकामय असा आहे. पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त नसलेली माती या ठिकाणी दिसून येते. परंतु तरीदेखील बरेच शेतकरी खूप कष्ट करून या ठिकाणी शेती करतात. याच शेतकऱ्यांमधील लिखमाराम मेघवाल यांनी त्यांच्या शेतामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत तैवान पिंक पेरूची लागवड केलेली आहे.

विशेष म्हणजे ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे पीक घेणे कठीण होते अशा ठिकाणी त्यांनी तैवान पिंक पेरूचे पीक फुलवले आहे. जर त्यांच्या तैवान पिंक पेरूच्या लागवडीविषयी पाहिले तर ही लागवड त्यांनी 2020 मध्ये केली. ज्या मातीत शेती करणे अतिशय अवघड होते अशा ठिकाणी त्यांनी परिश्रम करून ही पेरू बाग फुलवली आहे. लिहमाराम यांनी लखनऊ या ठिकाणाहून तैवान पिंक पेरूचे रोपे विकत घेतली व एक रोप त्यांना 140 रुपयाला मिळाले.

2020 मध्ये संपूर्णपणे सेंद्रिय खतांचा वापर करून त्यांनी त्याची लागवड केली व गांडूळ खताचा देखील व्यवस्थित वापर केला. वेळोवेळी कृषी तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन या पद्धतीने त्यांच्याच देखरेखीखाली या झाडांची जोपासना केली व आता त्यांना फळे लगडली आहेत. याबद्दल लिहमाराम मेघवाल यांनी सांगितले की लागवड करताना त्यांनी दोन रोपातील अंतर पाच बाय सहा अशा पद्धतीने ठेवले असून या अंतरामुळे झाडे एकमेकां जवळ पोहोचत नाही व त्यामुळे मोकळी जागा शिल्लक राहून हवा खेळती राहते व झाडांची वाढ चांगली होते.

मागच्या वेळेला त्यांना एका झाडापासून तीन किलो पेरूचे उत्पादन मिळाले होते व यावर्षी प्रतिसाद दहा किलो उत्पादन होण्याचा त्यांना अंदाज आहे. विशेष म्हणजे जेव्हा कोरोना कालावधीमध्ये संपूर्ण देशात लॉकडाऊन लागलेले होते व सगळ्या प्रकारचे व्यवहार ठप्प होते अशा वेळेस त्यांनी घरी यूट्यूब च्या माध्यमातून तैवान पिंक पेरूच्या लागवडीविषयी संपूर्ण माहिती घेतलेली होती व या अनुषंगाने त्यांनी निश्चित केले होती की तैवान पिंक पेरूची लागवड शेतात करायची.

त्यानंतर त्यांनी सर्व माहिती घेऊन दोनशे रोपांची लागवड अगोदर करण्याचे ठरवले. दोनशे झाडांची लागवड देखील केली. परंतु त्यामधून 50 झाडे नष्ट झाली व 150 रोपे जगली. पहिल्या वर्षाला प्रति झाडापासून तीन किलो पेरूचे उत्पादन मिळाले व यावेळेस दहा किलो प्रति झाड उत्पादन मिळण्याची अपेक्षा त्यांना आहे व त्यातून लाखो रुपयांचे उत्पादन हाती येईल अशी देखील अपेक्षा त्यांना आहे.

अशा पद्धतीने आपल्याला लिहमाराम मेघवाल यांच्या उदाहरणावरून दिसून येते की सोशल मीडियाचा चांगला वापर करून आपण खूप चांगल्या पद्धतीने आर्थिक प्रगती देखील करू शकतो व शेती देखील समृद्ध करू शकतो.