Farmer Success Story: शेतकऱ्याने युट्युबवरून आत्मसात केले स्ट्रॉबेरी शेतीची कौशल्य! एका एकरात कमवत आहे 2 ते 3 लाख रुपये

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Success Story:- आजकाल प्रत्येक जण स्मार्टफोन वापरतो व या स्मार्टफोनच्या माध्यमातून सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. परंतु जर आपण या सोशल मीडियाचा वापर पाहिला तर तो प्रामुख्याने व्हिडिओ तसेच वेगवेगळे रिल्स पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होत असतो.

तसेच दुसरे महत्त्वाचे म्हणजे यूट्यूब सारख्या सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर अनेक माहितीपूर्ण असे विविध क्षेत्रातील पारंगत व्यक्तींचे देखील व्हिडिओ येत असतात व यामध्ये कृषी क्षेत्राशी निगडित देखील व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर युट्युब वर आपल्याला पाहायला मिळतात.

या कृषी क्षेत्राशी संबंधित असलेल्या व्हिडिओमध्ये विविध पिकांच्या लागवडीपासून तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कृषी क्षेत्रामध्ये कसा करावा इत्यादी संबंधित संपूर्ण माहिती आपल्याला अशा व्हिडिओच्या माध्यमातून मिळत असते. अशाच एका शेतकऱ्याने मोबाईलचा वापर केला परंतु त्याचा वापर करताना मात्र स्वतःचा फायदा कसा होईल या दृष्टिकोनातून वापर करून आज हा व्यक्ती स्ट्रॉबेरी शेतीतून लाखो रुपये कमवत आहे. याच शेतकऱ्याची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.

 युट्युब वरून घेतले स्ट्रॉबेरी शेतीचे धडे

बाराबंकी जिल्ह्यातील अनेक शेतकरी पाहिले तर ते आता नवनवीन पद्धतीने शेती करत आहे तो कमीत कमी खर्चामध्ये चांगला नफा पिकांच्या उत्पादनातून मिळवत आहेत. या पद्धतीने श्रीकांत नावाचा एक तरुण शेतकरी हा उत्तर प्रदेश राज्यातील बाराबंकी जिल्ह्यातील असून तो स्ट्रॉबेरी शेतीच्या माध्यमातून लाखो रुपये मिळवत आहे.

श्रीकांत याची परिस्थिती पाहिली तर तो अगोदर 25 ते 30 गुंठा क्षेत्रामध्ये स्ट्रॉबेरी लागवड करत असे. या मधून त्याला चांगला नफा मिळायला लागल्यानंतर त्याला प्रोत्साहन मिळाले व तो आता एक एकर स्ट्रॉबेरी लागवडीतून दोन ते तीन लाख रुपये गुंतवणूक करून एका एकर मधून साडेतीन लाख रुपयांचा नफा मिळवत आहे.

श्रीकांत याच्या शेतीची पद्धत पाहून त्या ठिकाणच्या अनेक शेतकऱ्यांनी त्याचीच पद्धत अवलंबत स्ट्रॉबेरी शेती करायला सुरुवात केली आहे. याबाबत श्रीकांत याने सांगितले की, अगोदर भातशेती तसेच गव्हाची लागवड ते शेतामध्ये करायचे. परंतु कष्ट आणि खर्चाच्या मानाने मात्र आर्थिक फायदा त्या माध्यमातून दिसत न होता.

म्हणून काहीतरी नवीन पिकांची लागवड करावी या शोधात असताना युट्युब वर श्रीकांत यांना स्ट्रॉबेरीची शेती विषयी माहिती मिळाली व ही संपूर्णपणे माहिती मिळवत त्यांनी एक बिघा क्षेत्रात स्ट्रॉबेरी ची शेती करायला सुरुवात केली. आज एक एकर क्षेत्रामध्ये स्ट्रॉबेरी लागवड केलेली आहे.

स्ट्रॉबेरी लागवडीसाठी शेत तयार करून ठिबक अगोदर पसरवली जाते व त्यानंतर लागणारी खते, कीटकनाशकांची फवारणी तसेच मजूर इत्यादींचे व्यवस्थापन करून  योग्य पिकाचे नियोजन श्रीकांत यांनी केले आहे. जर स्ट्रॉबेरी शेतीचा एक एकरसाठी लागणारा खर्च पाहिला तर तो साधारणपणे दोन ते तीन लाख रुपये येतो व या गुंतवणुकीतून एका एकर क्षेत्रामध्ये तीन ते साडेतीन लाख रुपये सहज नफा होतो असे देखील त्यांनी म्हटले.

अशा पद्धतीने श्रीकांत यांनी युट्युबची मदत घेतली व स्ट्रॉबेरी शेतीची सगळे कौशल्या अंगीकारून स्ट्रॉबेरीची शेती केली व आज ते लाखो रुपयांचा फायदा मिळवत आहे. यावरून सोशल मीडियाचा वापर आपल्या फायद्यासाठी कसा करावा? हे श्रीकांत यांच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते.