Farming Business Idea: एका हेक्टरमध्ये करा ‘या’ झाडाची लागवड अन कमवा 5 लाखांपेक्षा अधिक; खर्च आहे खुपच कमी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farming Business Idea : भारतातील नवयुवक आता मोठ्या प्रमाणात शेती व्यवसायाकडे (Farming) वळत आहेत.

विशेष म्हणजे शेती व्यवसायात नवयुवक आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत असून पारंपरिक पिकाला फाटा देत आता नवीन नगदी तसेच मागणी मध्ये असलेल्या पिकांची लागवड करत आहेत.

यामुळे शेतकऱ्यांना (Farmer) चांगला बक्कळ पैसा (Farmers Income) देखील आता मिळू लागला आहे. आज आपण देखील बाजारात कायम मागणी मध्ये असलेल्या पॉपलर झाडाच्या लागवडीविषयी (Poplar Tree Farming) जाणुन घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणुन घेऊया याविषयी.

पोपलरला आहे मोठी मागणी
मित्रांनो ज्या पद्धतीने बाजारात धान्याला नेहमीच मागणी असते, त्याच प्रमाणे देशासह संपूर्ण जगात या झाडांच्या लाकडाची मागणी वाढली आहे. हेच कारण आहे की, आजकाल पॉपलर ट्री फार्मिंग करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगला बक्कळ फायदा होतं आहे.

कारण आजकाल बाजारात पॉपलर लाकडाला खूप मागणी आहे. या झाडाची शेती केवळ भारतातच नव्हे तर इतर अनेक देशांमध्ये केली जात आहे.

पॉपलर लागवडीविषयी काही महत्वाची माहिती
तापमान- मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या झाडाच्या शेतीसाठी 5 डिग्री सेल्सिअस ते 45 डिग्री सेल्सिअस या रेंजमध्ये तापमान राहिल्यास झाडाची वाढ चांगली होते यामुळे उत्पादनात भरीव वाढ होते.

कृषी तज्ञांच्या मते भारतीय वातावरण पॉपलर झाडाच्या शेतीसाठी अत्यंत अनुकूल आहे. तथापि, ज्या ठिकाणी जास्त बर्फवृष्टी होते अशा प्रदेशात याची लागवड केली जाऊ शकत नाही. कारण या झाडाला थेट सूर्यप्रकाश लागतो.

जमीन कशी असावी- शेतकरी बांधवांना जर पॉपलर झाडाची लागवड करायची असेल तर त्यासाठी शेतजमिनीच्या मातीचा पीएच किंवा सामू 6 ते 8.5 pH दरम्यान असावा असा सल्ला कृषी क्षेत्रातील जाणकार लोक देत असतात. कारण हे झाड जमिनीतील ओलावा सहज शोषून घेते.

शेतकरी बांधवांनो लक्षात ठेवा की लागवड करण्यापूर्वी पॉपलरची रोपे आणल्यानंतर लगेचच तीन ते चार दिवसांत ती लावावीत, कारण पॉपलर रोप उशिरा पुनर्लागवड केल्यास झाडे मजबूत होण्याची शक्यता होऊन जाते. यामुळे झाडांची वाढ व्यवस्थित होत नाही शिवाय उत्पादनात घट होते.

पॉपलर झाडाची रोपे कुठे खरेदी करायची?
डेहराडूनचे फॉरेस्ट रिसर्च युनिव्हर्सिटी, गोविंद वल्लभ पंत कृषी विद्यापीठ, मोदीपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल यासह अनेक कृषी केंद्रांमधून तुम्ही त्याची रोपे मिळवू शकता.

किती होणार कमाई
तुम्ही कोणतीही शेती केली तर तुमच्या मनात पहिला प्रश्न येतो की त्यातून किती कमाई होईल. तर आम्‍ही तुम्‍हाला इथं सांगू इच्छितो की एका अंदाजानुसार, जर तुम्ही एक हेक्‍टरमध्ये पॉपलरची लागवड केली तर 5 ते 6 लाखांपर्यंत सहज कमाई होऊ शकते.

झाडांची काळजी घेतल्यास एका हेक्टरमध्ये 250 झाडे सहज उगवली जातात आणि त्यांची लांबीही 80 फुटांपर्यंत जाते. त्याचे लाकूड बाजारात 700 ते 800 रुपये प्रति क्विंटल दराने विकली जाते.

या झाडाचा लॉग 2 हजारांपर्यंत सहज विकला जातो. शेतकरी मित्रांनो पॉपलरच्या झाडात आंतरपीक म्हणून ऊस, गहू, हळद, बटाटा, धणे, टोमॅटो, लसूण इत्यादी अनेक पिकांची लागवड केली जाऊ शकते.