Krushi Business Idea : 120 रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या ‘या’ पिकाची आता लागवड केली तर हिवाळ्यात लाखोंची कमाई होणारं, कसं ते वाचा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Krushi Business Idea : मित्रांनो अलीकडे शेतीमध्ये (Farming) मोठा बदल केला जात आहे. आता भारतात पारंपारिक पिकांच्या (Traditional Crops) तुलनेत बागायती तसेच नगदी पिकांच्या (Cash Crops) लागवडीकडे शेतकरी बांधव (Farmer) अधिक आकृष्ट होत असल्याचे चित्र आहे.

शेतकरी आता धान्याव्यतिरिक्त फळे, भाजीपाला, औषधे आणि मसाल्यांच्या लागवडीवर अधिक भर देत आहेत. यातील काही पिके शेतकऱ्यांना दुप्पट उत्पन्न (Farmer Income) मिळवून देतात. जाणकार लोक देखील शेतकरी बांधवांना नगदी तसेच बागायती पिकांच्या शेतीचा सल्ला देत आहेत.

मित्रांनो नगदी किंवा बागायती पिकांच्या लागवडीतून शेतकऱ्यांना कमी श्रमात चांगला नफा मिळतो. या पिकांमध्ये आले किंवा अद्रकचा (Ginger Crop) देखील समावेश होतो, ज्याचा वापर भारतात वर्षाच्या 365 दिवस केला जातो. अशा परिस्थितीत या पिकाची लागवड शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर ठरणार आहे. यामुळे आज आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी अद्रक किंवा आले शेती (Ginger Farming) विषयक काही महत्त्वाच्या बाबी घेऊन हजर झालो आहोत.

अशा प्रकारे आल्याची लागवड करा

बहुतेक शेतकरी फळबागांमध्ये सह-पीक म्हणून आल्याची लागवड करतात. मोठ्या झाडांमध्ये आंतरपीक म्हणून या पिकाची लागवड करून दर्जेदार उत्पादन मिळण्यास मदत होते. 6 ते 7 pH मूल्य असलेली माती लागवडीसाठी सर्वोत्तम आहे.

शेतात बेड तयार करून बियाणे पेरले जाते, त्यासाठी ओळींमध्ये 30 ते 40 सेंमी आणि रोपांमध्ये 25 ते 25 सेमी अंतर ठेवावे.

पेरणीनंतर कंदांना पालापाचोळा किंवा शेणखताने झाकून टाकावे, जेणेकरून कंद व्यवस्थित अंकुरू शकतील.

एक हेक्टर शेतात आले पेरण्यासाठी सुमारे 2 ते 3 क्विंटल बियाणे किंवा कंद पुरेसे आहेत.

त्याच्या लागवडीसाठी, सर्वप्रथम, सेंद्रिय पद्धतीने जमीन तयार करून बेड तयार केले जातात, जेणेकरून पीक पाणी तुंबणे आणि तणांच्या जोखमीपासून वाचवता येईल.

त्यानंतर वेळोवेळी आले पिकाची काळजी व व्यवस्थापनाची कामे करा.

लक्षात ठेवा आले पिकाची थोडी वाढ झाली की पिकातील तण काढल्यानंतर पिकाला माती लावली जाते.

आले उत्पादन आणि उत्पन्न

आले पीक कंद लावल्यानंतर सुमारे 9 महिन्यांत तयार होते. आल्याच्या झाडाची पाने पिवळी पडून सुकतात आणि आले काढणीचे काम केले जाते. अशा प्रकारे, शेतकरी आरामात प्रति हेक्टर 150 ते 200 क्विंटल आले उत्पादन घेऊ शकतात. बाजारात आल्याचे भाव गगनाला भिडले आहेत. सुमारे 80 ते 120 रुपये किलो दराने त्याची विक्री होते. अशा प्रकारे आल्याची लागवड करून हेक्टरी 70 ते 80 हजार रुपयांचे उत्पन्न मिळू शकते.