Monsoon Update: पंजाबरावांचा अंदाज…!! पावसासाठी पोषक वातावरण, ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस

Monsoon Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने (Monsoon) पुन्हा एकदा राज्यात हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. मोसमी पावसासाठी (Monsoon News) पोषक वातावरण तयार होत असल्याने राज्यात आता अनेक भागात मोसमी पाऊस (Rain) पुन्हा एकदा जोर धरू लागला आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही भागांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देखील जारी केला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या मते, राज्यातील कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. या विभागासाठी भारतीय हवामानशास्त्र विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. आज कोकणातील दक्षिण भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच मराठवाडा, मध्य महाराष्ट्र मध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या सुधारित अंदाजानुसार, आज रायगड, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, नगर, पुणे, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, या जिल्ह्यात पावसाची शक्‍यता असून येलो ॲलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच भारतीय हवामान विभागाने दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांसाठी पावसाचा जोरदार ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

दरम्यान, आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे पंजाबराव डख यांचा देखील अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) आता समोर आला आहे. पंजाबराव यांनी वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, आज पाच ऑगस्ट रोजी राजधानी मुंबई तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक या जिल्ह्यासमवेतच राज्यात जवळपास सर्वत्र पाऊस कोसळणार आहे.

आज 5 ऑगस्ट ते सहा ऑगस्ट पर्यंत राजधानी मुंबईसमवेत मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक या जिल्ह्यासमवेत राज्यात जवळपास सर्वत्र पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज पंजाबराव (Panjabrao Dakh News) यांनी वर्तवला आहे. एवढेच नाही तर सात आणि आठ ऑगस्ट रोजी राज्यात सर्वत्र पाऊस राहणार असल्याचा अंदाज देखील यावेळी डख यांनी वर्तवला आहे. दरम्यान पंजाबराव (Panjabrao Dakh) यांनी शेतकरी बांधवांना सल्लादेखील जारी केला आहे. पंजाबराव यांच्या मते, ज्यावेळी राज्यात पावसाची उघडीप असेल त्यावेळी शेतकरी बांधवांनी लागलीच शेतीची कामे उरकून घ्यावीत.