Panjabrao Dakh : ब्रेकिंग! आजपासून दोन दिवस पाऊस कायम, मात्र ‘या’ तारखेनंतर पावसाची उघडीप

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाची (Rain) जोरदार हजेरी बघायला मिळत आहे. यामुळे खरीप हंगामातील (Kharif Season) पिकांना फटका बसत आहे. विशेषता नाशिक जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसामुळे द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे.

नाशिक जिल्ह्यात (Nashik) गेल्या चार ते पाच दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने द्राक्ष बागांचे नुकसान होत आहे. यामुळे द्राक्षासाठी संपूर्ण भारतात ख्याती प्राप्त असलेले नाशिक जिल्ह्यातील बागायतदार पावसाची उघडीप होण्याची वाट पाहत आहेत. नाशिक (Nashik Rain) व्यतिरिक्त राज्यातील इतरही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस बघायला मिळत आहे.

राजधानी मुंबई तसेच ठाणे मुंबई उपनगर पालघर पुणे सातारा पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा इत्यादी ठिकाणी पावसाची (Monsoon) हजेरी बघायला मिळत आहे. यामुळे काही ठिकाणी जीवन विस्कळित झाले आहे तर काही ठिकाणी यामुळे खरीप हंगामातील पिकांना नवीन उभारी देखील मिळत आहे.

दरम्यान संततधार पाऊस (Monsoon News) सुरू असल्याने राज्यातील अनेक धरणे 100 टक्के क्षमतेने भरली असून आता धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे नदीकाठी वसलेल्या गावातील गावकऱ्यांना सावधान राहण्याचा इशारा देखील या वेळी देण्यात आला आहे. राज्यात नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत.

दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात गजबजलेल नाव म्हणजेचं पंजाबराव डख यांचादेखील हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) समोर आला आहे. पंजाबराव (Panjabrao Dakh News) यांनी आपल्या नवीन सुधारित हवामान अंदाजात नाशिक जिल्ह्यातील बागायतदारांसाठी एक दिलासादायक अंदाज जारी केला आहे. पंजाब राव यांनी वर्तवलेलं नवीन तर हवामान अंदाजानुसार आज आणि उद्या नाशिक जिल्ह्यात पाऊस राहणार आहे. यानंतर मात्र नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कमी होणार आहे.

24 सप्टेंबर पर्यंत नाशिक जिल्ह्यातील पाऊस हा पूर्णतः जाणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. नाशिक जिल्ह्यात लवकरच सूर्यदर्शन होणार असल्याचे पंजाबराव यांनी सांगितले आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान पंजाबराव यांनी वर्तवलेल्या आपल्या एका अंदाजानुसार, महाराष्ट्रातून या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की दरवर्षी 17 सप्टेंबर पासून राज्यातून परतीच्या पावसाला सुरुवात होते मात्र यावर्षी परतीचा पाऊस हा तब्बल पंधरा दिवस उशिरा परतणार असल्याचे पंजाबराव यांनी नमूद केले आहे.

तसेच यावर्षी दिवाळीत पाऊस पडणार असून मराठवाडा आणि विदर्भात या कालावधीत अधिक पाऊस कोसळणार आहे. नाशिक जिल्ह्यात देखील दिवाळीत पाऊस पडणार असल्याचे पंजाबराव यांनी नमूद केले आहे. तसेच या वर्षी 28 ऑक्टोबर पासून थंडीला सुरुवात होणार असल्याचे पंजाब राव यांनी नमूद केले आहे.