Sarkari Yojana : शिंदे सरकारच शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट! आता शेतकऱ्यांना मिळणार वर्षाकाठी 12 हजार, डिटेल्स वाचा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sarkari Yojana : महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांसाठी (Farmer) एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो नवोदित शिंदे सरकार (Eknath Shinde) राज्यातील शेतकऱ्यांना एक मोठं दिवाळी गिफ्ट देण्यासाठी तयारी करत असल्याचे चित्र आहे.

मित्रांनो हाती आलेल्या माहितीनुसार नवोदित शिंदे-फडणवीस सरकार केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात लवकरच एक शेतकरी हिताची योजना (Farmer Scheme) सुरू करणार आहे. मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे 2018 पासून केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या भल्यासाठी पीएम किसान सम्मान निधि योजना (Pm Kisan Yojana) नामक एक महत्त्वाकांक्षी योजना (Agricultural Scheme) कार्यान्वित केली आहे.

या योजनेच्या (Yojana) माध्यमातून देशभरातील तब्बल दहा कोटीहून अधिक शेतकरी बांधवांना वार्षिक सहा हजार रुपयांची मदत मायबाप शासनाकडून दिली जात आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की आपल्या राज्यातील जवळपास एक कोटी पाच लाख शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील शेतकरी बांधवांना आता दुहेरी फायदा मिळणार आहे.

मित्रांनो मीडिया रिपोर्टनुसार, महाराष्ट्रात लवकरच नवोदीत शिंदे फडणवीस सरकार मुख्यमंत्री किसान सम्मान निधि योजना (Mukhyamantri Kisan Yojana) सुरू करणार आहे. या योजनेच्या माध्यमातून देखील राज्यातील शेतकरी बांधवांना सहा हजार रुपये दिले जाणार आहेत.

अशा परिस्थितीत राज्यातील शेतकरी बांधवांना 12 हजार रुपये वार्षिक मिळणार आहेत. सहा हजार रुपये पीएम किसान सम्मान निधि योजनेचे आणि सहा हजार रुपये नव्याने येणाऱ्या या योजनेचे शेतकऱ्यांना मिळू शकणार आहेत. एकंदरीत पीएम किसान सम्मान निधि योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील शेतकरी बांधवांना आता या दोन्ही योजनेच्या माध्यमातून 12 हजार रुपयांची मदत मिळणार आहे.

मुख्यमंत्री किसान योजना (sarkari yojana)

मीडिया रिपोर्टमध्ये केलेल्या दाव्यावर जर विश्वास ठेवला तर नवोदित शिंदे फडणवीस सरकार लवकरच राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी मुख्यमंत्री किसान योजना नामक एक कल्याणकारी योजना सुरू करणार आहे. या योजनेच्या माध्यमातून पीएम किसान सम्मान निधि योजनेप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे.

या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी बांधवांना वार्षिक सहा हजार रुपये अनुदान स्वरूपात मदत दिली जाणार आहे. पीएम किसान सम्मान निधि योजनेप्रमाणे मुख्यमंत्री किसान सम्मान निधि योजनेत देखील टप्प्याटप्प्याने वार्षिक सहा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. निश्चितच एकनाथ शिंदे व मंत्रिमंडळ यांनी हा ऐतिहासिक निर्णय आगामी काही दिवसात घेतला तर शेतकऱ्यांना हे मोठे दिवाळी गिफ्ट राहणार आहे.