सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! शेतकरी हिताच्या ‘या’ योजनेसाठी 700 कोटीच्या निधीला प्रशासकीय मान्यता ; शेतकऱ्यांचा होणार फायदा, देवेंद्र फडणवीसांची माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Solapur Breaking : शेतकऱ्यांना शेती करताना नानाविध अडचणींचा सामना करावा लागतो. यामध्ये प्रामुख्याने पाण्याची समस्या आणि विजेच्या समस्येचा समावेश होतो. मित्रांनो महाराष्ट्रात शेतकरी बांधवांना शेती करण्यासाठी अजूनही पर्याप्त विजेची सुविधा उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. शेतकरी बांधवांना सध्या वीज उपलब्ध होते मात्र वीज हीं दिवसा उपलब्ध होत नसून रात्रीच जास्त करून उपलब्ध होते.

शिवाय सध्या उपलब्ध होणारी वीज ही 12 घंटे उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना शेती करताना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. दरम्यान राज्याचे वर्तमान उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री यांनी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे एका कार्यक्रमादरम्यान शेतकरी बांधवांना दिवसा बारा तास वीज उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस असल्याचे बोलून दाखवले आहे. यासाठी विजेचे फिडर सौरऊर्जेवर आणणार असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले आहे.

यातून जवळपास चार हजार मेगावाट विजेचे उद्दिष्टे असून यामुळे शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. शुक्रवारी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे विविध विकास कामांच्या ऑनलाईन लोकार्पण आणि भूमिपूजन प्रसंगी फडणवीस बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी राज्य शासनाकडून चालवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची देखील माहिती दिली आहे. फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, सोलर फिडर साठी आतापर्यंत जागेची समस्या शासनाला भेडसावत होती.

मात्र आता शासनाने सोलर फिडर साठी शेत जमीन भाडेतत्त्वावर घेण्यास सुरवात केली आहे. शासनाकडून सोलर फिडर साठी 75 हजार रुपये हेक्टरी प्रति महिना या दराने शेतकऱ्यांकडून शेत जमीन सोलर फिडर साठी भाडेतत्त्वावर घेतली जाणार आहे. एवढेच नाही तर तीस वर्षानंतर संबंधित शेतकरी बांधवांना त्यांची शेत जमीन परत दिले जाणार आहे.

निश्चितच यामुळे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळणार आहे तसेच वीज निर्मितीसाठी देखील शेतकऱ्यांचे सहकार्य लाभणार आहे. वीजनिर्मिती मोठ्या प्रमाणात होणार असल्याने शेतकरी बांधवांना दिवसा 12 तास वीज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. यावेळी फडणवीस यांनी अतिवृष्टी नुकसान भरपाई बद्दल माहिती देताना सांगितले की आत्तापर्यंत शेतकरी बांधवांना 65 मिलीपेक्षा अधिक पाऊस झाल्यास नुकसान भरपाई साठी पात्र समजले जात होते.

मात्र, वर्तमान राज्य शासनाने ही अट शिथिल करून आता सतत पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाई देऊ केली आहे. सततच्या पावसामुळे नुकसान झालेले मात्र 65 मिलीच्या अटीमध्ये न बसणाऱ्या शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाई दिली जात आहे. बार्शी तालुक्यातील शेतकरी बांधवांना यावर्षी 80 कोटी रुपयांची नुकसान भरपाई वर्ग करण्यात आली आहे.

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी बार्शी तालुक्यातील उपसा सिंचन योजनेबाबत माहिती दिली आहे. बार्शी तालुक्यातील उपसा सिंचन योजनेसाठी 700 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामुळे तालुक्यातील बारा हजार 250 हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येणार आहे. या उपसा सिंचन प्रकल्पला जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. यामुळे बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे. यामुळे तालुक्याच्या विकासाला हातभार लागणार असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले आहे.