Soybean Cultivation: सोयाबीन पिकावर पिवळा मोजेक रोगाचे सावट..! ‘या’ रोगावर अशा पद्धतीने नियंत्रण मिळवून शेतकरी कमवू शकतात लाखों

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Cultivation: भारतात सध्या खरीप हंगाम (Kharif Season) प्रगतीपथावर आहे. या खरीप हंगामात भारतात सोयाबीन (Soybean Crop) आणि कापूस लागवडीखालील क्षेत्र वाढले असावे असा तज्ञांचा अंदाज आहे.

गत खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस पिकाला समाधानकारक बाजार भाव (Soybean Market Price) मिळाला असल्याने या हंगामात या दोन्ही मुख्य पिकांचे लागवडीखालील क्षेत्र वाढणार हे आधीच भाकीत होते. मित्रांनो सोयाबीन हे महाराष्ट्रातील एक खरीप हंगामातील मुख्य पीक आहे. राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे (Farmer) सर्व अर्थकारण हे सोयाबीन या मुख्य पिकावरचं अवलंबून आहे.

अशा परिस्थितीत सध्यास्थितीत सोयाबीन उत्पादक शेतकरी (Soybean Grower Farmer) सोयाबीनच्या चांगल्या वाढीसाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र असे असले तरी राज्यात सध्या सोयाबीन पिकावर पिवळा मोजक हा रोग (Yellow Mosaic Disease) सोयाबीनच्या पिकाची नासाडी करत असल्याचे चित्र आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी या रोगावर वेळीच नियंत्रण मिळवणे आता अत्यावश्यक बनले आहे.

या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी पांढरी माशी (White Fly) या किडीवर नियंत्रण मिळवावे लागते. मित्रांनो खरं पाहता पिवळा मोजेक हा रोग पांढरी माशी या किडीच्या प्रादुर्भावामुळे होत असतो. अशा परिस्थितीत या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी पांढरी माशी नियंत्रित करणे अतिशय आवश्यक असते. त्यामुळे आज आपण पांढरी माशी कशा पद्धतीने नियंत्रित केली जाऊ शकते याविषयी सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.

सोयाबीन पिकावर आलेल्या पिवळ्या मोज़ेक रोगाची लक्षणे नेमकी कशी आहेत बरं…! 

जाणकार लोकांच्या मते, या रोगाच्या सुरुवातीला हा रोग काही झाडांवरच दिसून येतो, पण हळूहळू तो भयंकर रूप धारण करतो. जेव्हा सोयाबीन पिकावर पिवळ्या मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव होतो तेव्हा काही झाडांवर गडद हिरवट पिवळे ठिपके दिसतात. संपूर्ण झाडे वरून पिवळी पडतात आणि नंतर सर्व शेतात पसरतात. यानंतर या रोगामुळे झाडे मऊ होतात, तसेच झाडे मुरगळतात. कधी कधी पानेही खडबडीत होतात.

पिवळा मोज़ेक रोगावर उपाय तरी नेमके काय…!

शेतकरी बांधव शेतात वेगवेगळ्या ठिकाणी पिवळे चिकट सापळे लावू शकतात यामुळे सोयाबीन पिकासाठी घातक ठरलेला हा रोग पसरणार नाही.

 तसेच जाणकार लोक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सल्ला देतात की शेतकरी बांधवांनी संक्रमित झाडे उपटून टाकावी आणि शेतापासून दूरवर खड्डा खणून गाडून टाकून नष्ट करावीत.

शेतकरी बांधव कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या सल्ल्याने तसेच कृषी तज्ञांच्या सल्ल्याने किंवा कृषी सेवा केंद्र चालक यांच्या सल्ल्याने कीटकनाशकांची फवारणी करू शकतात.

याशिवाय, शेतकरी बांधवांनी यांचा प्रतिबंध करण्यासाठी पुढील हंगामापासून सोयाबीनच्या नव्याने विकसित केलेल्या चांगल्या सुधारित वाणांची पेरणी करावी.