Soybean Farming: सोयाबीन शेती शेतकऱ्यांना लखपती बनवेल…! पेरणी केल्यानंतर 21 दिवसात करा ‘हे’ एक काम, लाखोंची कमाई होणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Farming: भारतात एकूण तीन हंगामात शेती (Farming) केली जाते. खरीप हंगा, रब्बी हंगाम, तसेच उन्हाळी हंगाम या एकूण तीन हंगामात शेतकरी बांधव शेती करत असतात. सध्या देशात खरीप हंगाम  (Kharif Season) सुरू आहे.

अशा परिस्थितीत देशातील शेतकरी बांधव (Farmer) खरीप हंगामातील पिक पेरणीसाठी लगबग करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. राज्यातील शेतकरी देखील खरीप हंगामाच्या पिक पेरणीसाठी धावपळ करत आहे.

खरीप हंगामात आपल्या देशात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची शेती (Soybean Cultivation) केली जाते. देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनात (Soybean Production) महाराष्ट्राचा देखील मोठा सिंहाचा वाटा आहे. अशा परिस्थितीत राज्यातील शेतकरी बांधव आता सोयाबीन पेरणी साठी लगबग करत असल्याचे दिसत आहे.

खरं पाहता सोयाबीन हे एक नगदी पिक (Cash crop) आहे. याची लागवड खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे सोयाबीन पिकाला खरीप हंगामातील मुख्य पीक म्हणून ओळखले जाते शिवाय राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण हे सोयाबीन पिकावर अवलंबून असते.

मात्र असे असले तरी राज्यात गत उन्हाळी हंगामात शेतकरी बांधवांनी सोयाबीन पिकाची यशस्वी लागवड करून दाखवली आहे. यामुळे सोयाबीन हे फक्त खरीप हंगामातील पिक आहे असा समाज आता पुसला गेला आहे. सोयाबीन हे जरी नगदी पीक असले तरी देखील सोयाबीन पिकात होणाऱ्या तणामुळे सोयाबिनच्या उत्पादनात मोठी घट होते.

परिणामी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना लाखोंचा भुर्दंड सहन करावा लागतो. तसेच पिकात तण झाल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांच्या (Soybean Grower Farmer) उत्पादन खर्चात देखील मोठी वाढ होते. अशा परिस्थितीत सोयाबीन पिकात तण नियंत्रण करणे अतिशय महत्त्वाचे असल्याचे तज्ञ नमूद करतात.

खर पाहता, कोणत्याही पिकाच्या उत्पादनात तण घट घडवून आणते. सोयाबीन मध्ये देखील असंच आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी पिकातील तण नष्ट करण्यासाठी खूप अधिक मेहनत घेत असतो. कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, तणामुळे सोयाबीन पिकाच्या उत्पादनात 30 ते 40 टक्के घट होते.

यामुळे सोयाबीन पिकातील तणाचा नायनाट करण्यासाठी शेतकरी बांधवांनी योग्य त्या उपाययोजना केल्या पाहिजेत. खरं पाहता सोयाबीन उत्पादक शेतकरी सोयाबीन पेरणी केल्याबरोबर तणनाशक फवारतात. परंतु अनेक शेतकरी बांधवांनी सोयाबीन उगवण होण्‍यापूर्वी तणनाशक फवारलेले नाही.

अशा परिस्थितीत आता सोयाबीन पिकात तन वाढत आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी सोयाबीन पेरणी केल्यानंतर 17 ते 21 दिवसांच्या दरम्यान तणनाशकाची फवारणी करण्याचा सल्ला दिला जातो.

या तणनाशकांची फवारणी करा

शेतकरी बांधव क्रिस्टल कंपनीचे अमोरा, Adama कंपनीचे shaked, odyssey कंपनीचे BASF या तणनाशकाचा एक वेळ अवश्य विचार करू शकतात. मात्र कोणत्याही प्रकारची फवारणी करताना शेतकरी बांधवांनी तज्ञ लोकांचा सल्ला एकदा अवश्य घ्यावा. तज्ञ लोकांशी विचारपूस करून फवारणीचे प्रमाण देखील योग्य निवडावे.