Soybean Farming : सोयाबीन पिकातून चांगले उत्पन्न मिळेल! फक्त यावेळी ‘हे’ काम करावं लागेल, 100% फायदा होणारं

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Farming : सोयाबीन हे एक प्रमुख तेलबिया पीक (Oilseed Crop) आहे. या तेलबिया पिकाची आपल्या भारतात खरीप हंगामात (Kharif Season) मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. आपल्या राज्यात देखील सोयाबीन लागवड (Cultivation Of Soybean) विशेष उल्लेखनीय आहे.

महाराष्ट्र राज्य देशाच्या एकूण सोयाबीन (Soybean Crop) उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. अशा परिस्थितीत राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे (Farmer) सर्व अर्थकारण सोयाबीन या नगदी पिकावर (Cash Crop) अवलंबून असल्याचे स्पष्ट होते. मित्रांनो या वर्षी सोयाबीन पेरणीचा कालावधी मोठा भिन्न आहे.

सोयाबीन पिकाचे काही ठिकाणी अर्धे आयुष्य पूर्ण झाले असून पीक फुलोरा अवस्थेत बघायला मिळत आहे. तर काही ठिकाणी सोयाबीन पिकात शेंगा भरायला सुरुवात झाली आहे. याशिवाय काही ठिकाणी पीक अजून तीस ते चाळीस दिवसांचे असल्याचे शेतकरी नमूद करत आहेत.

अशा परिस्थितीत, आज आपण सोयाबीन पिकाच्या पीक व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत. मित्रांनो खरे पाहता, सोयाबीन पिकातून चांगले उत्पन्न (Farmer Income) मिळवण्यासाठी सोयाबीन पिकात तण व्यवस्थापन करणे अतिशय महत्त्वाचे ठरते.

सोयाबीन पिकात वाढणारे तण सोयाबीन पिकाचे सर्व पोषण घेत असल्याने सोयाबीन पिकाला याचा विपरीत परिणाम सहन करावा लागतो. सोयाबीन पिकात वाढणाऱ्या तणामुळे सोयाबीनच्या उत्पादनावर परिणाम होत असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. अशा परिस्थितीत सोयाबीन पिकात वाढणाऱ्या तणावर वेळीच नियंत्रण (soybean crop management) मिळवले पाहिजे.

सोयाबीनमध्ये एकात्मिक तण व्यवस्थापन

पीक पेरणीनंतर 30 ते 45 दिवसपर्यंत तणांवर नियंत्रण मिळवणे अत्यंत आवश्यक आहे.

सोयाबीन पिकात वेळोवेळी खुरपणी किंवा निंदणी केली पाहिजे. तसेच सोयाबीन पिकात कोळपनी देखील वेळीच झाली पाहिजे 

एक निंदणी पीक उगवल्यानंतर 30 दिवसांनी करावी.

रासायनिक पध्दतीने तणांचे नियंत्रण- पिकाची पेरणी केल्यानंतर आणि उगवणीपूर्वी डायक्लोसुलम 84% डब्ल्यूडीजी (स्ट्राँग आर्म) 12.5 ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात 200 लिटर पाण्यात विरघळवून पेरणीनंतर 3 दिवसांच्या आत फवारावे.

उभ्या पिकात रुंद पाने आणि गवत तणांचे नियंत्रण- इमिझेथापायर 10% SL (परशूट) 400 मिली प्रति एकर + एमएसओ एडजुवेंट 400 मिली प्रति एकर 200 लिटर पाण्यात विरघळवून तण 1 ते 2 पानांच्या अवस्थेत असताना किंवा पेरणीनंतर 15-20 दिवसांनंतर आणि जमीनमध्ये ओलावा असताना फवारणी करावी.

उभ्या पिकात रुंद पाने आणि गवत कुळातील तणांचे नियंत्रण- इम्झामॉक्स 35 टक्के + इमजेथाफायर 35 टक्के डब्ल्यूजी (ओडिसी) 40 ग्रॅम + एमएसओ एडजुवेंट 400 मिली प्रति एकर 200 लिटरमध्ये विरघळवून पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी शेतात ओलावा असताना फवारावे. 

उभ्या पिकात रुंद पानांचे व अरुंद पानावरील तणांचे नियंत्रण- प्रोपॅक्विझाफॉप 2.5 टक्के + इमेजथेअर 3.75 टक्के मेगावॅट (साकेड) 800 मिली प्रति एकर 200 लिटर पाण्यात विरघळवून 15 ते 20 दिवसांनी शेतात ओलावा असताना फवारणी करावी.

येथे दिलेली माहिती ही कोणत्याही स्वरूपात अंतिम राहणार नाही. कोणत्याही पिकात कोणत्याही औषधाची फवारणी करण्या अगोदर कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांचा तसेच कृषी सेवा केंद्र चालक यांचा सल्ला घेणे अतिशय आवश्यक राहणार आहे याची सर्व शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी.