Soybean Farming: सोयाबीनला फुलधारणा कमी झालीय का? अहो मग ही एक फवारणी करा, फुलधारणा चांगली होणारं

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Farming: भारतात गेल्या अनेक वर्षांपासून खरीप हंगामात (Kharif Season) शेतकरी बांधव (Farmer) सोयाबीन या मुख्य पिकाची (Soybean Crop) शेती करत आले आहेत. भारतात सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय असून सोयाबिनच्या उत्पादनात भारताचा एक मोठा सिंहाचा वाटा आहे.

भारताच्या एकूण सोयाबीन उत्पादनात महाराष्ट्राचा (Maharashtra) देखील मोठा वाटा असून महाराष्ट्र, मध्यप्रदेश पाठोपाठ भारतात दुसऱ्या क्रमांकाचे सोयाबीन उत्पादक (Soybean Cultivation) राज्य बनले आहे. यामुळे निश्चितच महाराष्ट्राच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. दरम्यान गतवर्षी सोयाबीनला चांगला बाजारभाव (Soybean Rate) मिळाला असल्याने यावर्षी सोयाबीनच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे.

सध्या राज्यातील सोयाबीन पिकाला फुलधारणा होत असल्याचे चित्र आहे. जाणकार लोकांच्या मते, जर सोयाबीन पिकाला कमी फुलधारणा झाली असेल तर उत्पादनात मोठी घट घडून येणार आहे. यामुळे सोयाबीन पिकात चांगली फळधारणा घडवून आणण्यासाठी काही फवारणी करण्याचा सल्लादेखील जाणकार लोकांकडून दिला जातो.

अशा परिस्थितीत आज आपण सोयाबीन पिकात फुलधारणा कमी प्रमाणात झाली असेल तर फुलधारणा वाढवण्यासाठी कुठली फवारणी आणि कोणत्या वेळी फवारणी करणे फायदेशीर ठरू शकते याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मित्रांनो जस की आपणास ठाऊकचं आहे की, सोयाबीनचे उत्पादन हे सर्वस्वी फुलं धारणेवर अवलंबून आहे. जेवढ्या प्रमाणात सोयाबीनला फुलं लागतील तेवढ्याच सोयाबीनला शेंगा देखील लागणार आहेत. अशा परिस्थितीत सोयाबीन पिकाचे उत्पादन हे सर्वस्वी फुलधारणेवर अवलंबून आहे.

फुलधारणा चांगली होण्यासाठी ही फवारणी ठरणार फायदेशीर:- सोयाबीन पिकात फुलधारणा कमी झाली असेल तर शेतकरी बांधव फुलधारणेसाठी आवश्यक टॉनिक व त्यासोबत अळीनाशक, बुरशीनाशक, सोबतच विद्राव्य खतांची फवारणी करू शकतात.

फुलधारणा चांगली होण्यासाठी ईमामेक्टीन(Emamectin) त्यासोबतच गोदरेज डबल नावाचे टॉनिक आणि साफ(Saaf) नावाचे बुरशी नाशक आणि 13.40.13 किंवा बोराँन या औषधांची फवारणी फायदेशीर ठरत असल्याचा दावा जाणकार करत आहेत. म्हणजेचं ईमामेक्टीन + गोदरेज डबल + साफ + 13.40.13 किंवा बोराँन अशी ही फवारणी राहणार आहे.

मित्रांनो सोयाबीन पिकात चांगली फुलधारणा व्हावी यासाठी फवारणी करतांना स्वच्छ पाणी शेतकरी बांधवांनी वापरायला हवे तसेच शेतकरी बांधवांनी फवारणीत स्टिकर देखील वापरणे गरजेचे राहणार आहे. पावसाचे वातावरण असल्याने स्टिकर वापरण्याचा सल्ला जाणकार देत आहेत. मित्रांनो, कोणत्याही प्रकारची फवारणी करण्याआधी तज्ञ लोकांचा तसेच कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांचा, कृषी सेवा केंद्र चालक यांचा सल्ला घेणे अपरिहार्य राहणार आहे. इथे दिलेली माहिती ही अंतिम राहणार नाही.