Success Story : 72 वर्षाच्या तरुणाचा नादच खुळा! मुलांना ओझे होऊ नये म्हणून रिटायरमेंटनंतर सुरू केला ‘हा’ शेती व्यवसाय, आज करताय जंगी कमाई

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Success Story : मित्रांनो कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी वयाचे बंधन नसते. मग ते क्षेत्र शेतीचे (Farming) का असेना. केरळ राज्यातील कोट्टायम येथील एका 72 वर्षाच्या तरुण अवलियाने हे सिद्ध करून दाखवले आहे.

एकीकडे आपल्या देशातील नवयुवक शेती व शेतीपूरक व्यवसायाला घाट्याचा सौदा म्हणत असतो तर दुसरीकडे या 72 वर्षाच्या तरुणाने शेतीतून लाखोंची कमाई (Farmer Income) करण्याची किमया साधली आहे. जोसेफ काराकाडू, केरळमधील कोट्टायम येथील चांगनासेरी येथील रहिवासी या 72 वर्षाच्या अवलियाने शेतीपूरक व्यवसायातून (Agriculture Business) लाखोंची उलाढाल केली आहे.

जोसेफ यांची खरी सुरुवात झाली ती सहा वर्षांपूर्वी जेव्हा ते त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी अमेरिकेला गेले होते. अमेरिका वारीवर असताना जोसेफ यांनी एका मॉल मध्ये ड्रॅगन फ्रुटची (Dragon Fruit Crop) चव चाखली उत्तम होती आणि त्यावेळी या ड्रॅगनफ्रुटची किंमत सात डॉलर एवढी अमेरिकेत होती. ड्रॅगन फ्रुटला तिथे एक स्टिकर लावले होते. त्या स्टिकर वरती इक्वाडोरच्या एका कंपनीकडून ड्रॅगन फ्रुट इम्पोर्ट केल्याचे मेंशन होते. त्यानंतर त्यांनी याविषयी इंटरनेटवर शोधाशोध केली.

या फळाच्या लागवडीसाठी (Dragon Fruit Farming) विशेष अशी काळजी घ्यावी लागत नसल्याचे जोसेफ यांना समजले. मग काय त्यांनी ज्या ड्रॅगन फ्रुटची चव चाखली त्या कंपनीकडूनच ड्रॅगन फ्रुटच्या स्टेम मागवल्या. अमेरिकेतून देखील आपल्या मुलांकडून ड्रॅगन फ्रुटच्या काही स्टेम आपल्या मायदेशी भारतात आणल्या. भारतात आल्यानंतर त्यांनी ड्रॅगन फ्रुटच्या रोपांची रोपवाटिका (Dragon Fruit Nursery) किंवा नर्सरी खोलायची असा निर्णय घेतला.

आज 2022 मध्ये तब्बल सहा वर्षानंतर जोसेफ यांचा हा शेतीपूरक व्यवसाय चांगलाच गाजला आहे आणि जोसेफ काराकाडू ऑर्चर्ड्स या कंपनीचे मालक बनले आहेत. त्यांची कम्पनी तैवान, ब्राझील, फिलीपिन्स, ऑस्ट्रेलिया, इक्वेडोर आणि यूएस सह अनेक देशांमधून गोळा केलेल्या 88 प्रकारच्या ड्रॅगन फळांची विक्री करते.

खरं पाहता जोसेफ इंडस्ट्रियल टेक्निशियन आहेत. त्यांनी आपल्या आयुष्याचा बराच काळ हैदराबाद मध्ये खर्च केला. हैदराबाद मध्ये मशीन टूल इंडस्ट्री ते चालवत होते. मात्र पुढे त्यांना आपल्या मायदेशी परतण्याची इच्छा झाली. मायदेशी केरळमध्ये परतल्यानंतर येथे देखील त्यांनी त्यांचे काम सुरू केले. मात्र केरळमध्ये त्यांना त्यांच्या व्यवसायात फारस चांगल यश मिळालं नाही. यानंतर जोसेफ यांनी इलेक्ट्रिकल वेहिकल इंडस्ट्री मध्ये आपले नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला.

मात्र या ठिकाणी देखील त्यांना घोर निराशा हाती आली. मात्र ध्येयवेड्या 72 वर्षीय तरुण जोसेफ यांनी ठरवलं होते की त्यांना रिटायरमेंटनंतर आपल्या मुलांच्या खांद्यावर ओझे म्हणून राहायचे नाही. मग काय या पठ्ठ्याने आपले तिन्ही मुलं जे की विदेशात राहतात त्यांच्या मदतीने ड्रॅगन फ्रुटची नर्सरी उभी केली आणि आजच्या घडीला जोसेफ यांची ही नर्सरी व्यापक रूप घेऊन एका कंपनीत परिवर्तित झाली आहे.

ड्रॅगन फ्रूटच्या काही जाती त्यांनी स्वत: विकसित केल्याचा जोसेफचा दावा आहे. नर्सरीमध्ये 10 पैकी दोन वाणांची यशस्वीपणे लागवड करण्यात आली आहे. त्यांना ‘लाल चिली’ आणि ‘वंडर बॉय’ अशी नावे देण्यात आली आहेत. ते म्हणतात, “नवीन प्रकारचे फळ विकसित करण्यासाठी आणि त्याला मान्यता मिळण्यासाठी किमान पाच वर्षे लागतात.”

जोसेफ ड्रॅगन फ्रुट ची रोपे 100 ते बाराशे रुपये प्रति रोप या दराने विकतात. म्हणजे ड्रॅगन फ्रुटच्या जातीवर याची किंमत अवलंबून असते. याशिवाय कुरियर द्वारे रोपे पाठवली जात असल्याने याचा अतिरिक्त खर्च जोसेफ ग्राहकांकडून घेत असतात.

रेड जैना, कंट्री रोड्स, शुगर ड्रॅगन, फ्रँकीज रेड अँड कोलंबियन यलो, अरमांडो, अमेरिकन ब्युटी, डिलाईट, इस्रायल यलो, आयसिस गोल्ड, पालोरा, नॅचरल मिस्टिक, लेमन ऑरेंज, व्हीनस, ओरेगॉन आणि वाल्डिव्हिया रोजा हे ड्रॅगन फळांचे काही प्रकार आहेत जे की जोसेफ विकतो. जोसेफ महिन्याकाठी 6000 ड्रॅगन फ्रुटची रोपे विकत असल्याचा त्यांचा दावा आहे. निश्चितच जोसेफ या शेतीपूरक व्यवसायातून लाखोंची उलाढाल करत आहेत.