भावा सलाम तुला…!! भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान भारतात परतले, सुरु केली शेती, आज लाखोंची करताय कमाई

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Success Story: मित्रांनो 1971 मध्ये भारत आणि पाकिस्तानात युद्ध (India-Pakistan War) झाले त्या काळात अनेक लोकांनी पाकिस्तान मधून भारतात स्थलांतर केले. या विस्थापित लोकांना भारतात सुरवातीच्या काळात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. मात्र आपल्या कष्टाच्या जोरावर या लोकांनी आज एक वेगळे स्थान समाजात कमावले आहे. युद्धाच्या काळात पाकिस्तान मधून धुंडा सिंग देखील भारतात आलेत.

1971 च्या भारत-पाक युद्धात विस्थापित झालेल्या लाखों लोकांपैकी धुंडा सिंह एक आहेत. मित्रांनो खरे पाहता धुंडा सिंग हे मूळचे पाकिस्तानचे, मात्र 1971 मध्ये पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेत. 1971 मध्ये धुंडा जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात स्थायिक झाले. युद्धाच्या काळात भारतात आलेल्या लोकांना भारत सरकारने अनेक सोई सुविधा देण्याचा प्रयत्न केला.

धुंडा सिंग यांना देखील मायबाप शासनाने सुलतानपूर गावात उदरनिर्वाहासाठी 4 एकर शेतीजमीन (Farming) दिली. त्यावर त्यांनी अनेक धान्य पिके घेण्यास सुरुवात केली. मात्र यातून मिळणाऱ्या उत्पादनातुन (Farmer Income) त्यांना घरखर्च चालवणे देखील कठीण होते. त्यानंतर त्यांनी शेतीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने त्यांनी कृषी विभागाचा (Agriculture Department) सल्ला घेतला. मग काय धुंडा सिंग यांनी शास्त्रोक्त पद्धतीने हळदीची लागवड (Turmeric Farming) करण्यास सुरूवात केली. यामुळे त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलले आणि आज तो एक यशस्वी शेतकरी (Successful Farmer) बनला आहे.

राज्य सरकारने त्यांना चार एकर शेतजमीन दिली मात्र शेत जमीन नापीक आणि बागायती नसल्याने त्यांना त्यातून अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळत होते. त्यातून मिळणारे उत्पन्न मधून त्यांना फक्त घर खर्च भागविणे शक्‍य होते. मात्र नंतर त्यांनी शासनाच्या मदतीने शेतात बोरवेल आणि कालवा तयार केला. यामुळे त्यांनी पारंपरिक पिकांसोबतच भाजीपाला वर्गीय पिकांची शेती केली. यामुळे त्यांच्या उत्पन्नात (Agriculture News) किंचित वाढ झाली.

हळदीची लागवड केली अन आयुष्य बदललं 

मात्र, उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने धुंडा सिंग यांनी शेतीत बदल करण्याचा निर्णय घेतला. मग काय 2012 मध्ये कृषी विभागाने धुंडा सिंग यांना हळदीची लागवड करण्याचा सल्ला दिला. एवढेच नाही तर त्यांना शासनाकडून हळदीचे बियाणे देखील देण्यात आले.

यासह, केंद्र पुरस्कृत योजना राष्ट्रीय कृषी विकास योजना (RKVY) अंतर्गत अल्प प्रमाणात ग्राइंडिंग आणि प्रोसेसिंग युनिट्सची स्थापना करण्यासाठी 3.80 रुपये अनुदान देखील प्रदान करण्यात आले. धुंडा सिंग यांनी हळद लागवड आणि प्रक्रियेतून चांगले उत्पन्न मिळवले, ज्यामुळे त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारली. यानंतर त्यांनी ‘बीडीएस ब्रँड’ या लेबलखाली हळदीची लागवड आणि प्रक्रिया सुरू केली.

त्यानंतर 2019 मध्ये, धुंडा सिंग केरळमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पाइसेस रिसर्च (IISR) कोझिकोड येथे 15 दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाले होते. येथे त्यांना तज्ज्ञांनी हळद लागवडीत उत्तम पॅकेजिंग आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन धोरणाचा अवलंब करण्याचा सल्ला दिला. ICAR-IISR संस्थेने सुचवलेली काही तंत्रे खालीलप्रमाणे आहेत:

  • Rhizome, ज्याला कंद देखील म्हणतात, फक्त निरोगी rhizomes पेरणीसाठी वापरावे, अन्यथा रोगामुळे पीक नष्ट होऊ शकते.
  • साठवण आणि लागवडीपूर्वी 30 मिनिटे बियाण्यांवर मॅन्कोझेब (0.3%) किंवा कार्बेन्डाझिम (0.3%) ची प्रक्रिया करा. हे रोग आणि कीटकांमुळे होणारे नुकसान टाळू शकते.
  • वालुकामय चिकणमाती असलेली जमीन हळद लागवडीसाठी योग्य असते, ज्यात पाण्याचा निचरा योग्य करावा. त्यामुळे ड्रेनेजची विशेष काळजी घ्या.
  • जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि तण कमी करण्यासाठी मल्चिंग वापरणे चांगले राहते.
  • झाडांचे रोगांपासून संरक्षण करण्यासाठी ट्रायकोडर्मा हार्झिअनम कडुनिंबाच्या पेंडीमध्ये मिसळावे.
  • हळदीचे चांगले पीक घेण्यासाठी सेंद्रिय व रासायनिक खतांचा संतुलित प्रमाणात वापर करावा.

आयआयएसआरच्या वरील तंत्राचा वापर करून धुंडा सिंग यांनी हळद पिकात आश्चर्यकारक वाढ केली आणि त्यांचा नफाही वाढला. आता धुंडा सिंग स्वत: इतर शेतकऱ्यांना या तंत्रांचा अवलंब करण्याचा सल्ला देत आहेत. आयआयएसआरच्या प्रगत तंत्राचा अवलंब करून कठुआ आणि संभा जिल्ह्यातील शेतकरी शेतीतून चांगला नफा कमावत आहेत.