दादासाहेब भारीच कि रावं…! 10 गुंठ्यात दादासाहेबांनी घेतले कारल्याचे विक्रमी उत्पादन, झाली लाखाची कमाई; वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Successful Farmer: देशातील शेतकरी बांधव (Farmer) गेल्या अनेक वर्षांपासून शेतीमध्ये (Farming) मोठा बदल करत आहेत.

पारंपरिक पिक पद्धत्तीला बगल दाखवत शेतकरी बांधव आता नगदी पिकांची (Cash Crop) तसेच अल्प कालावधीत काढणीसाठी तयार होणाऱ्या पिकांची शेती करू लागले आहेत.

विशेष म्हणजे शेतीमध्ये केलेला हा बदल त्यांच्यासाठी मोठा फायद्याचा ठरत आहे. मराठवाड्यातील (Marathwada) बीड जिल्ह्याच्या (Beed District) एका शेतकऱ्याने देखील शेती मध्ये नावीन्यपूर्ण बदल करत भाजीपाला (Vegetable Crop) वर्गीय पिकातून चांगली कमाई करून दाखवली आहे.

बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधव शेती मध्ये बदल करण्यासाठी विशेष ओळखले जातात. आता जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मौजे कोळगाव येथील दादासाहेब साळुंखे या शेतकऱ्याने देखील शेतीमध्ये बदल करत हजारो रुपये उत्पन्न कमावण्याची किमयाही साधली आहे.

अल्पभूधारक शेतकरी असतानादेखील शेती व्यवसायात चांगले उत्पन्न मिळवल्याने पंचक्रोशीत दादासाहेबांची चर्चा रंगली आहे. दादासाहेब खरं पाहता, ऊसतोड कामगार आहेत आणि ते नेहमी ऊस तोडणी साठी बाहेर असतात.

मात्र, यावर्षी त्यांच्या मातोश्री यांची तब्येत बरी नसल्याने ते आपल्या गावी आले होते. गावी आल्यानंतर दादासाहेब यांनी शेती करावी असा निर्णय घेतला. या अनुषंगाने त्यांनी आपल्या 10 गुंठे शेतजमिनीत भाजीपाला लावला.

त्यांनी आपल्या 10 गुंठे जमिनीत कारले लागवड (Bitter Gourd Farming) केली आणि यातून तब्बल 80 हजाराची कमाई केली. कमी जमिनीत दादासाहेब यांनी चांगले उत्पन्न मिळवले असल्याने त्यांचे सर्वत्र मोठं कौतुक केलं जातं आहे.

मित्रांनो आम्ही आपणांस सांगू इच्छितो कि, दादासाहेबांनी मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कारले पिकाची लागवड केली होती. मार्च मध्ये लागवड केल्यानंतर कारले पिकांची दादासाहेबांनी चांगली जोपासना केली.

आणि अवघ्या तीन महिन्यात कारल्याच्या पिकातुन उत्पादन घेऊन दाखवले. अल्प कालावधीत कारले पिकातून चांगले उत्पन्न मिळाल्याने आजूबाजूचे शेतकरी दादासाहेबांच्या मळ्यात हजेरी लावत आहेत.

विशेष म्हणजे कोळगावचे सरपंच उद्धव रासकर यांनी दादासाहेबांचा त्यांच्या शेतात जाऊन सत्कार देखील केला आहे. सध्या त्यांना 40 रुपये किलोचा दर मिळाला आहे आणि यातून 80 हजाराचे उत्पन्न मिळाले आहे.

विशेष म्हणजे अजून या पिकातून त्यांना कमाई होण्याची आशा आहे. म्हणजेच 10 गुंठ्यात दादासाहेब यांना 1 लाखाच्या आसपास कमाई होणार आहे. निश्चितचं दादासाहेबांची ही कामगिरी कौतुकास्पद आहे आणि इतरांना प्रेरणा देणारी आहे.