Sugarcane Farming : या पद्धतीने ऊस लागवड बनवु शकते ऊस उत्पादकांना मालामाल; वाचा ऊस लागवडीची शास्त्रीय पद्धत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Krushi news : भारतात (India) इतर पिकांच्या तुलनेत उसाचे सर्वाधिक उत्पादन (Sugarcane Production) घेतले जाते. ब्राझील नंतर भारतात सर्वाधिक ऊस उत्पादन करणारा देश आहे.

आपल्या राज्यातही उसाचे विक्रमी उत्पादन (Maharashtra Sugarcane Production) घेतले जाते. यावर्षी महाराष्ट्राने तर ऊस उत्पादनात आपला सिंहाचा वाटा असल्याचे दाखवून दिले आहे.

यावर्षी महाराष्ट्रात एका गाळप हंगामात (Sugarcane Threshing Season) सर्वाधिक साखरेचे उत्पादन (Sugar Production) झाले असून साखर उत्पादनात महाराष्ट्राने उत्तर प्रदेश या राज्याला मागे पाडले आहे.

यामुळे निश्चितच महाराष्ट्राच्या शिरेपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. मित्रांनो खरं पाहता ऊस हे एक नगदी पीक असून याची शेती शेतकऱ्यांसाठी खुपच फायदेशीर ठरत आहे. ही एक गवताची प्रजाती असल्याचे सांगितले जाते.

ऊस हे हमखास उत्पादन मिळवून देणारे पीक आहे मात्र उसाच्या चांगल्या उत्पादनासाठी तापमान, जमीन आणि पाणी या तीन बाबींची विशेष काळजी घ्यावी लागते. ऊसासाठी शेतकरी ठिबक सिंचनाचा देखील अवलंब करू शकता.

यामुळे पाण्याची बचत होते शिवाय उसाचा दर्जा चांगला राहत असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. जसं की आम्ही सांगितलं ऊस एक नगदी पीक आहे, त्यामुळे त्याची लागवड करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी त्याची संपूर्ण माहिती घ्यावी, जेणेकरून त्यांचे उत्पादनही चांगले होईल आणि नफाही चांगला मिळेल. त्यामुळे चांगले उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मापदंड लक्षात घेऊन जास्त उत्पादन देणारे व रोगमुक्त वातावरणात याची लागवड करावी असा सल्ला दिला जातो.

ऊस या नगदी पिकासाठी आवश्‍यक शेतजमीन आणि ऊसाचे प्रगत वाण
कृषी तज्ञांच्या मते, उसाची शेती विविध प्रकारच्या जमिनीत करता येते. चिकणमाती, गुळगुळीत, लॅटराइट, कापसाची काळी मृदा, तपकिरी अशा कोणत्याही प्रकारच्या जमिनीत उसाची लागवड करता येते.

मात्र असे असले तरी जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता असणे अतिशय महत्त्वाचा आहे. याशिवाय खोल दल असलेली जमीन व सुपीक माती असलेली शेतजमीन ऊस लागवडीसाठी योग्य असल्याचे सांगितले जाते.

याशिवाय ज्या जमिनीत उसाची शेती केली जाणार आहे अशा जमिनीत नायट्रोजन, कॅल्शियम आणि फॉस्फरस योग्य प्रमाणात असायला हवेत. यासोबतच ऊस उत्पादकांनी उसाच्या पिकातून चांगले बक्कळ उत्पादन मिळवण्यासाठी उसाच्या चांगल्या प्रगत वाणाची निवड करावी असा सल्ला दिला जातो.

शेतकरी बांधवांनी ऊसाची लागवड करताना जास्त गोडवा आणि चांगले उत्पादन देणाऱ्या ऊसाचे वाण निवडावे. यामध्ये करण 4, को-15023, को पंत 12221, को पंत 12226, बिरेंद्र, नयना इत्यादी वाणाचा समावेश असू शकतो.

ऊस लागवड प्रक्रिया आणि बियाणे मधील अंतर
लागवडीची पद्धत आणि शेतातील त्याची घनता व्यावसायिक पद्धतीने उसाच्या लागवडीवर परिणाम करते, त्यामुळे याची लागवड करताना विशेष काळजी घ्यावी लागते. ऊस नेहमी ओल्या जमिनीत लावावा. त्यामुळे लागवडीपूर्वी पाणी द्यावे.

एका मीटरमध्ये बारा कळ्या किंवा उसाचं बेन लावा. यानंतर, उसाचं बेन आणि कंपोस्ट जमिनीत हलके दाबून लावावे. प्रत्यारोपणासाठी तयार केलेल्या बेणावर थेट सूर्यप्रकाश पडणार नाही याची काळजी घ्या. बेणं लागवडीनंतर मातीने झाकून पाणी द्यावे. एका एकरात उसाची लागवड करण्यासाठी दोन बेणांचे 24 हजार संच लागत असल्याचा दावा केला जातो. मातीनुसार दोन ओळींमध्ये 90 ते 120 सेंमी अंतर ठेवावे.

उसाच्या वाढीसाठी आवश्यक पोषकतत्व
उसाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी नायट्रोजन, कॅल्शियम आणि फॉस्फरसची गरज असते. त्यामुळे चांगल्या उत्पादनासाठी अशा खताचा वापर करावा. शेतातील हिरवळीचे खत कुजून तयार केलेले नत्र अत्यंत फायदेशीर आहे.

लावणीच्या हंगामाच्या आधारावर उसामध्ये खत देण्याची शिफारस केली जाते. ऊसाच्या उत्पादनात पोटॅशियम, मॅग्नेशियम, बोरॉन आणि जस्त महत्त्वाची भूमिका बजावतात, त्यामुळे संबंधित खतांचा वापर करून हे सर्व वाढवता येऊ शकते.

ऊस शेतीतुन चांगले उत्पादन सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना
चांगल्या ऊस उत्पादनासाठी जमिनीचे pH मूल्य 6.6 ते 7.5 दरम्यान असावे. हवामान, मातीचा प्रकार आणि लागवड पद्धतीनुसार पाण्याची गरज वेगवेगळ्या प्रकारे बदलते. चांगल्या उत्पादनासाठी शेतकरी सुरुवातीच्या काळात मल्चिंग करू शकतात.

भाताचा पेंढा किंवा उसाचा कचरा मल्चिंगसाठी वापरता येतो. त्यामुळे बाष्पीभवन होऊन पिकाची पाण्याची मागणी कमी होईल. त्यामुळे पाण्याची बचत होते शिवाय उत्पादनात देखील वाढ होते.