Tomato Farming: शेतकरी पुत्रांनो नोकरीं सोडा…! ‘या’ टेक्निकने टोमॅटोची शेती करा, लाखों नव्हे करोडो कमवा; कसं ते वाचाच 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tomato Farming: भारतातील शेतकरी बांधव (Farmer) आता काळाच्या ओघात अल्प कालावधीत काढणीसाठी तयार होणाऱ्या भाजीपाला वर्गीय पिकांची मोठ्या प्रमाणात शेती करत आहेत. टोमॅटो देखील एक प्रमुख भाजीपाला वर्गीय पिकं (Vegetable Crop) आहे आणि टोमॅटोची शेती (Tomato Cultivation) आपल्या देशात मोठ्या प्रमाणात केली जाते.

याच्या वाढत्या वापरामुळे, बहुतेक शेतकरी त्यांच्या शेतात टोमॅटोची मुख्य पीक म्हणून किंवा आंतरपीक (Intercropping) म्हणून लागवड करतात. टोमॅटोच्या शेतीतून चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी बरेच शेतकरी प्रगत शेती (Agriculture) तंत्राचा अलीकडे वापर करू लागले आहेत.

यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना (Tomato Grower Farmer) फायदा देखील होत आहे आणि टोमॅटो शेतीतून शेतकरी बांधव लाखों रुपयांची कमाई (Farmer Income) करत आहेत. टोमॅटो शेतीत रिस्क कमी आहे. शिवाय टोमॅटोचे चांगल्या प्रतीचे पीक चांगल्या भावात (Tomato Rate) विकले जाते.

यामुळे टोमॅटो या भाजीपाला पिकाच्या शेतीकडे शेतकरी बांधव पुढे सरसावत आहेत. टोमॅटोची आधुनिक तंत्रज्ञानाने लागवड केल्यास दुप्पट उत्पन्न मिळत असल्याचा दावा केला जात आहे. या आधुनिक शेती तंत्रांमध्ये स्टॅकिंग तंत्राचा समावेश आहे, ज्याचा अवलंब केल्याने केवळ उत्पादनच वाढत नाही तर कीटक आणि रोगांसारखे धोके देखील कमी होत आहेत.

टोमॅटो लागवड करताना घ्यावयाची काळजी

टोमॅटो पिकापासून चांगले उत्पादन मिळविण्यासाठी पेरणी-लावणीची कामे काळजीपूर्वक करणे अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळे लागवडीपूर्वी मुळांमध्ये बुरशीनाशकासह बिजोपचार केले पाहिजे. 12% कार्बेन्डाझिम आणि 63% मेकोझेब मिसळून एक लिटर पाण्यात विरघळवून मुळीवर उपचार करा. मुळांवर बिजोपचार केल्याने टोमॅटोला योग्य रंग, दर्जेदार आणि निरोगी फळे मिळतात.

टोमॅटोची स्टॅकिंग पद्धतीने लागवड 

स्टॅकिंग पद्धतीला सामान्य भाषेत मांडव पद्धत्त किंवा तंत्र देखील म्हणतात, ज्यामध्ये बांबू, जाळी किंवा दोरीचा आधार घेऊन झाडे वरच्या बाजूस वाढविली जातात. हे तंत्र द्राक्षबागेतील फळे आणि भाज्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरते.

अशा पद्धतीने लागवड केल्यास टोमॅटोची फळे जमिनीवर पडून राहत नाहीत, तर वेलीवर दांडीने बांधलेली राहतात, त्यामुळे फळ कुजण्याची समस्या होत नाही.

सिंचनानंतर वेलीवर्गीय भाजीपाला कुजण्यास सुरुवात होते, परंतु स्टॅकिंग पद्धतीने ही समस्या देखील दूर केली जाते.

या पद्धतीने टोमॅटो पिकवल्याने जमिनीवर फारसे अतिक्रमण होत नाही, परंतु 30-35% कमी जमीन खर्च होऊन चांगले उत्पादन मिळते.

या पद्धतीने प्रत्येक ओळीत 5 मीटर अंतरावर 2 मीटर उंच बांबू किंवा जाळी लावली जाते, जेणेकरून त्यावर वेली गुंडाळता येतील.

प्रगत शेती करणारे देखील नायलॉन दोरी वापरतात आणि वेलींच्या वरच्या टोकाला दोरीने बांधतात.