Tractor News : सणासुदीला शेतीसाठी ट्रॅक्टरची खरेदी करायची का? मग ‘हे’ ट्रॅक्टर विकत घ्या, शेतीकामाला आहे उत्तम

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tractor News : शेतकरी बांधवांनो (Farmer) जर तुम्ही शेतीसाठी मजबूत आणि टिकाऊ ट्रॅक्टर (Tractor) घेण्याचा विचार करत असाल, तर मॅसी फर्ग्युसन कंपनीचा ट्रॅक्टर (massey ferguson tractor) तुमच्यासाठी निश्चितच फायद्याचा सौदा सिद्ध होणार आहे. मॅसी फर्ग्युसन (Massey Ferguson) ही ट्रॅक्टर बनवणारी एक प्रमुख कंपनी आहे.

या कंपनीचे मॅसी फर्ग्युसन 9500 स्मार्ट हे मजबूत आणि टिकाऊ ट्रॅक्टरपैकी एक आहे. हा ट्रॅक्टर शेतीची अवघड कामे देखील सहज करू शकतो. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवासाठी आज आम्ही मॅसी फर्ग्युसन कंपनीच्या ट्रॅक्टर विषयी बहुमूल्य माहिती (Tractor Information) घेऊन हजर झालो आहोत.

मॅसी फर्ग्युसन 9500 स्मार्ट ट्रॅक्टरची इंजिन क्षमता

Massey ferguson 9500 स्मार्ट ट्रॅक्टरला 3 सिलेंडर आणि 2700 CC चे उत्तम इंजिन देण्यात आले आहे. या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला 58 HP ची शक्ती देण्यात आली आहे. याशिवाय एअर फिल्टरसाठी ड्राय टाईप देण्यात आल आहे.  हा ट्रॅक्टर PTO hp 56 सह येतो.

मॅसी फर्ग्युसन 9500 स्मार्ट ट्रॅक्टरची प्रमुख वैशिष्ट्ये

Massey ferguson 9500 smart मध्ये ड्युअल क्लच आणि 8 फॉरवर्ड + 2 रिव्हर्स गीअर्स आहेत. या ट्रॅक्टरला ऑइल इमर्स्ड ब्रेक्स आणि पॉवर स्टीअरिंग देण्यात आले आहे. मॅसी फर्ग्युसन 9500 स्मार्ट ट्रॅक्टरची डिझेल टाकी क्षमता 70 लीटर आहे, जी फील्ड वर्कमध्ये चांगले मायलेज देते. 

तसेच, या ट्रॅक्टरमध्ये RPM 540 @/1790 ERPM आणि 12v 88 AH क्षमतेची बॅटरी आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, Massy ferguson 9500 स्मार्ट ट्रॅक्टरचे एकूण वजन 2560 kg आणि कमाल उचलण्याची क्षमता 2050 kg आहे. तसेच यामध्ये 2 WD व्हील ड्राइव्ह देण्यात आला आहे. याशिवाय कॅट 1 आणि कॅट 2 बॉल्स (कॉम्बी बॉल्स) च्या लिंक दिल्या आहेत.

मॅसी फर्ग्युसन 9500 स्मार्ट ट्रॅक्टरमधील इतर साधने

मॅसी फर्ग्युसन 9500 स्मार्ट ट्रॅक्टरमध्ये, कंपनी काही आवश्यक उपकरणे देखील पुरवते, जी शेतकरी गरजेच्या वेळी सहजपणे वापरू शकतात.

इतर उपकरणे – स्मार्ट हेड लॅम्प, स्मार्ट की, स्मार्ट क्लस्टर, चटई – फूट स्टेप, नवीन ग्लास डिफ्लेक्टर, सहायक पंप फ्रंट वेट स्पूल व्हॉल्व्ह इ.

मॅसे फर्ग्युसन 9500 स्मार्ट ट्रॅक्टरची किंमत

मॅसी फर्ग्युसन कंपनीने बनवलेले हे ट्रॅक्टर शेतकरी बांधवांसाठी अत्यंत किफायतशीर आहेत. Massey ferguson 9500 smart tractor ची किंमत सुमारे 8.40 लाख ते 8.90 लाख रुपये आहे.