Tractor News : बातमी कामाची! शेतीकामासाठी उत्कृष्ट असलेले देशातील टॉप 5 ट्रॅक्टर, किंमत आणि विशेषता जाणून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tractor News : गेल्या काही वर्षात भारतीय शेतकऱ्यांच्या जडणघडणीत ट्रॅक्टरने (Tractor) महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आता ट्रॅक्टर शेतकऱ्यांचा (Farmer) खरा सोबती म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. ट्रॅक्टर ही शेतकऱ्यांची शान आहे.

जवळपास प्रत्येक शेतीच्या (Farming) कामात ट्रॅक्टरचा वापर केला जातो. मजूरटंचाई दिवसेंदिवस अधिक वाढत असल्याने शेतीमध्ये ट्रॅक्टरचा उपयोग देखील वाढू लागला आहे. ट्रॅक्टरच्या (Top Tractor In India) वापराने कमी वेळेत आणि कमी मेहनतीत जास्त काम करता येते. त्यामुळे उत्पन्न वाढते.

अनेक ट्रॅक्टर कंपन्या भारतीय बाजारपेठेत सर्वोत्तम मॉडेल लाँच करत असतात. तुम्हीही शेतकरी असाल आणि नवीन ट्रॅक्टर (Tractor Information) घेण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी खास तुमच्यासाठी बनवण्यात आली आहे.

मित्रांनो आज आपण भारतातील टॉप 5 ट्रॅक्टर कोणते आहेत हे जाणून घेणार आहोत. शिवाय ट्रॅक्टरच्या (Agriculture Machine) विशेषता आणि किंमत आज आपण थोडक्यात पण सविस्तर जाणून घेणार आहोत.

फार्मट्रॅक 60 क्लासिक EPI T20 ट्रॅक्टर :- फार्मट्रॅक कंपनी ही देशातील अग्रगण्य ट्रॅक्टर निर्माती कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीचा फार्मट्रॅक 60 क्लासिक EPI T20 ट्रॅक्टर सध्या टॉपवर धावत आहे. हा ट्रॅक्टर शेतकऱ्यांमध्ये दिवसेंदिवस लोकप्रिय होऊ पाहत आहे. शेती कामासाठी अतिशय योग्य असल्याने या ट्रॅक्‍टरचा वापर आता भारतात वाढला आहे.

हा ट्रॅक्टर 50 अश्वशक्तीचा आहे. यात शक्तिशाली 3 सिलेंडर इंजिन आहे. फार्मट्रॅक 60 क्लासिक EPI T20 ची भारतीय बाजारपेठेत किंमत 7.00 ते 7.25 लाख रुपये आहे. मित्रांनो की एक्स शोरूम किंमत आहे. त्यामुळे ऑन रोड प्राईस यापेक्षा अधिक राहणार आहे.

महिंद्रा 475 DI XP Plus :- महिंद्राचा Mahindra 475 DI XP Plus ट्रॅक्टर सध्या बाजारात दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे 42 अश्वशक्तीसह येते. त्याचे शक्तिशाली हायड्रॉलिक विविध उपकरणांसह सहजतेने कार्य करतात. Mahindra 475 DI XP Plus ची भारतीय बाजारपेठेत किंमत 5.75 ते 6.10 लाख रुपये आहे. या ट्रॅक्टरची देखील ही एक्स शोरूम किंमत असून ऑन रोड प्राईस यापेक्षा अधिक राहणार आहे.

जॉन डियर 5310 :- जॉन डीरे 5310 ट्रॅक्टर तिसऱ्या क्रमांकावर आहे. यात उच्च इंजिन बॅकअप असल्याची माहिती मिळाली आहे. यात 9 फॉरवर्ड आणि 3 रिव्हर्स सिंक्रोमेश/कॉलर शिफ्ट ट्रान्समिशन आहेत. John Deere 5310 ची भारतीय बाजारात किंमत 7.89 ते 8.50 लाख रुपये आहे.

सोनालिका 745 DI III सिकंदर :- सोनालिका 745 DI III सिकंदर भारतात चौथ्या क्रमांकावर आहे. यात 50 HP चे इंजिन देखील आहे. हा एक विश्वासार्ह ब्रँड मानला जातो.  दीर्घकाळ चालणाऱ्या कामासाठी हा खूप चांगला ट्रॅक्टर आहे. सोनालिका 745 DI III सिकंदरची भारतीय बाजारपेठेत किंमत 5.70 ते 6.30 लाख रुपये आहे.

मॅसी फर्ग्युसन 1035 DI :- मॅसी फर्ग्युसन 1035 DI ट्रॅक्टरच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. हे 36 एचपी इंजिनसह येते. हे ट्रॅक्टर जड वजन वाहून नेण्यासाठी डिझाइन केलेले आहे. Massey Ferguson 1035 DI ची भारतीय बाजारपेठेत किंमत ₹ 5.20 ते 5.65 लाखांपर्यंत आहे.