कष्टाच चीज झालं ; शेतकऱ्यांच्या लेकाला उच्च शिक्षणासाठी मिळाली तब्बल एक कोटींची शिष्यवृत्ती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Washim News : शेतकऱ्याची पोर आता कोणत्याच क्षेत्रात मागे राहिलेले नाहीत. केवळ शेती व्यवसायातच नाही तर शिक्षणात देखील शेतकऱ्याची मुलं अभूतपूर्व अशी कामगिरी करून आपले व आपल्या राज्याचे नाव रोशन करत आहे.

वाशिम जिल्ह्यातूनही शेतकऱ्याच्या मुलाने शिक्षण क्षत्रात केलेल्या नेत्रदीपक कामगिरी समोर आली आहे. वाशिम जिल्ह्यातील एका शेतकरी पुत्राला उच्च शिक्षणासाठी एक कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. समाधान कांबळे असे या शेतकरी लेकाच नाव आहे. खरं पाहता समाधानची घरची आर्थिक परिस्थिती अतिशय हालाखीची आहे.

मात्र, आर्थिक परिस्थिती जेमतेम असताना देखील समाधानने सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. इंजीनियरिंग चांगल्या गुणांनी पास आऊट झाल्यानंतर समाधान यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. यामुळे निश्चितच विदर्भाच्या शिरपेच्यात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

विदर्भाच्या या पठ्याने एक कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मिळवली असल्याने सध्या या शेतकरी लेकाच्या बुद्धिमत्तेची सर्वत्र चर्चा रंगली आहे. शिष्यवृत्तीमुळे उच्च शिक्षणाचा समाधानचा मार्ग समाधानकारक रित्या पूर्ण होणार आहे. यामुळे समाजाच्या सर्व स्तरावरून समाधानचे कौतुक केले जात आहे.

समाधान विदर्भाच्या वाशिम जिल्ह्यातील पांगरी धनकुटे येथील रहिवासी आहेत. ते शेतकरी कुटुंबातील असून त्यांचे आई-वडील शेतात मजूरीच काम करतात. मजुरी करून स्वतःच्या पोटाला चिमटा देत मजुरीच्या पैशातून त्यांनी समाधानला उच्च शिक्षणासाठी पुण्याला पाठवले.

लेकाने देखील आई-वडिलांच्या कष्टाची जाण ठेवत चांगल्या पद्धतीने शिक्षण ग्रहण केले आहे. पुण्यातील सिंहगड इंजिनियरिंग कॉलेजमधून त्याने सिव्हिल इंजिनियरिंग उत्तम गुणांनी पूर्ण केले. इंजिनियरिंगमध्ये त्याने द्वितीय क्रमांक मिळवत यशाच्या गंतव्यस्थानाकडे प्रस्थान केले आहे.

दरम्यान आता त्याच्या यशासाठी या शिष्यवृत्ती चा देखील हातभार लागणार आहे. समाधान याला ऑस्‍ट्रेलियातील मेलबर्न येथे उच्‍च शिक्षण घेण्‍यासाठी १ कोटी रुपयांची शिष्‍यवृत्ती मिळाली आहे. यामुळे या शेतकऱ्याच्या मुलान कष्टाच चीज केलं असल्याच्या प्रतिक्रिया आता समोर येत आहेत.

समाधान यांच्या कुटुंबात आई वडील आणि पाच बहिणी आहेत. निश्चितच समाधान यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर शिक्षणात अव्वल स्थान पटकावले असून त्याच्या पुढील शिक्षणासाठी या शिष्यवृत्तीची मोठी मदत होणार आहे. त्यांनी आपल्या यशाने आपल्या कुटुंबाची तसेच विदर्भाची मान उंचावली आहे.