Wheat Farming : शेतकऱ्यांची होणारं बल्ले-बल्ले..! ‘या’ विद्यापीठाने विकसित केले गव्हाचे नवीन वाण, शेतकऱ्यांचा होणारं फायदा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Wheat Farming : भारतात गहू पिकाला (Wheat Crop) एक मुख्य नगदी पीक (Cash Crop) म्हणून ओळखलं जात. गव्हाची लागवड भारतात सर्वाधिक केली जाते. भारत आता गहू उत्पादनात आत्मनिर्भर बनला असून मोठ्या प्रमाणात गव्हाची निर्यात देखील करत आहे.

म्हणजेच भारत 130 कोटीं भारतीयांचे पालन पोषण करत आहे आणि आता जगाचे पालन पोषण करण्‍याकडे वळला आहे. मित्रांनो गव्हाची शेती (Farming) आपल्या महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात केली जाते. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच भागात कमी-अधिक प्रमाणात गव्हाची शेती पाहायला मिळते.

गहू उत्पादक शेतकरी बांधव (Wheat Grower Farmer) गव्हाच्या लागवडीतून चांगला बक्कळ पैसा (Farmer Income) देखील कमवत आहेत. मात्र असे असले तरी अनेकदा गहू उत्पादक शेतकरी बांधवांना (Farmer) गव्हासाठी अधिक खर्च करावा लागतो. गहू पीक अनेक रोगांना बळी पडते.

यामुळे पीक व्यवस्थापनात अधिक खर्च करावा लागतो. मात्र गहू उत्पादक शेतकरी बांधवांनी गव्हाच्या सुधारित जातींची (Wheat Variety) पेरणी केल्यास त्यांना अधिक उत्पादन मिळते शिवाय उत्पादन खर्चात देखील बचत होते कारण की अशा सुधारित जातींवर रोगांचे प्रमाण कमी असते.

मित्रांनो हाती आलेल्या माहितीनुसार पंजाब कृषी विद्यापीठाने देखील गव्हाच्या शेतीतुन शेतकरी बांधवांना अधिक उत्पादन मिळावे या अनुषंगाने गव्हाच्या नवीन जाती विकसित केल्या आहेत. गव्हाच्या या जाती विविध क्षेत्र, वेळ, माती, हवामान यानुसार चांगले उत्पादन देऊन शेतकऱ्यांना फायदा होईल. अहवालानुसार, लवकरच या तिन्ही जातींची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी कृषी शास्त्रज्ञही शेतकऱ्यांना मदत करणार आहेत.

पंजाब कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या गव्हाच्या जाती खालील प्रमाणे (Wheat Farming)  :- 

PBW 826 गहू : उत्तर-पूर्व आणि उत्तर-पश्चिम मैदानी प्रदेशांसाठी पीबीडब्ल्यू 826 गव्हाची जात जारी करण्यात आली आहे किंवा या जातीची शिफारस केली गेली आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेश, राजस्थान व्यतिरिक्त उत्तराखंड, जम्मू आणि हिमाचल प्रदेश यासह उत्तर-पश्चिम मैदानी भागातील शेतकऱ्यांना या जातीमुळे बंपर उत्पादन मिळेल. 

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की गव्हाच्या या जातीची रचना बागायती क्षेत्रासाठी केली गेली आहे, ज्यांचे धान्य खूप जाड आणि वजनदार आहे. तज्ञांच्या मते, ही एक दुर्मिळ प्रजाती आहे, जी देशातील अनेक मैदानी भागात गव्हाचे चांगले उत्पादन मिळवण्याचा विक्रम करेल.

PBW 872:- गव्हाच्या या नवीन जातीमुळे देशाच्या उत्तर-पश्चिम मैदानावरील माती आणि हवामानात उत्कृष्ट उत्पादन मिळेल. बागायत क्षेत्रात योग्य तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास पीबीडब्ल्यू जातीच्या लागवडीद्वारे गव्हाचे दर्जेदार उत्पादन मिळण्यास मोठी मदत होईल. आगात पेरणी केली जाणारी गव्हाची ही उच्च उत्पन्न देणारी जात आहे, ज्याची पेरणी रब्बी हंगामाच्या सुरुवातीस किंवा त्यापूर्वीही केली जाऊ शकते.

PBW 833 गहू:- पंजाब कृषी विद्यापीठाने प्रसिद्ध केलेली PBW 833 वाण ईशान्य भारतासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याची पेरणी केल्यास शेतकरी सामान्य वाणांपेक्षा अनेक पट अधिक उत्पादन घेऊ शकतात. प्रथिने आणि सर्व पोषक तत्वांनी युक्त PBW जातीची लागवड बागायती मैदानात फायदेशीर ठरेल. गव्हाची उशीरा लागवड म्हणजे पसात लागवड करण्यासाठी पीबीडब्ल्यू 833 गव्हाची जात वरदान ठरणार आहे.