Pm Kisan Yojana: पीएम किसान लाभार्थी कुठल्याही त्रासाशिवाय मोबाईल वरून करू शकतात ई-केवायसी! फॉलो करा या स्टेप

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan Yojana:- पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी राबवली जात असलेली एक महत्त्वाची योजना असून ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी आणि सर्वात यशस्वी योजना म्हणून ओळखली जाते.

शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळावा या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या माध्यमातून ही योजना सुरू करण्यात आलेली होती व तेव्हापासून आतापर्यंत साधारणपणे 15 हप्त्यांचे वितरण या योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे.

आपल्याला माहित आहे की, वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यात विभागून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या योजनेची रक्कम जमा केली जाते. या अनुषंगाने या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी केलेले जे शेतकरी आहेत त्यांना आता ई केवायसी करणे बंधनकारक आहे.

तसे पाहायला गेले तर ई केवायसीच्या दोन ते तीन पद्धती आहेत. यामध्ये तुम्ही ओटीपी च्या माध्यमातून ई केवायसी करू शकतात किंवा बायोमेट्रिक आधारित देखील ई केवायसी तुम्ही कॉमन सर्विस सेंटरवर जाऊन करू शकता.

परंतु ई केवायसी केली नसेल तर पीएम किसानचा लाभ संबंधित लाभार्थ्याच्या खात्यात येत नाही. त्यामुळे ई केवायसी करणे गरजेचे आहे.

 चेहरा आधारित केवायसी कशी करावी?

 यामध्ये शेतकऱ्यांना अनेक मार्गाने ई केवायसी करता येऊ शकते. जी पद्धत  शेतकऱ्यांना सोपी वाटेल त्या पद्धतीने शेतकरी ई केवायसी करू शकतात.

यामध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलवरून देखील ई केवायसी करू शकतात. इतर मार्गांपेक्षा हा मार्ग सर्वात सोपा असा मार्ग आहे. यामध्ये तुम्हाला काही स्टेप्स फॉलो करणे गरजेचे आहे. यामध्ये अशा पद्धतीने ई केवायसी केल्यानंतर 24 तासानंतर सगळे अपडेटेड माहिती पोर्टलवर तुम्हाला दिसून येते.

 मोबाईल वरून केवायसी करण्यासाठी या स्टेप फॉलो करा

1- त्यामध्ये सगळ्यात अगोदर गुगल प्ले स्टोअर वर जावे आणि तेथून पीएम किसान मोबाईल आणि आधार फेस आरडी ॲप डाऊनलोड करावे.

2- हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर ते ओपन करावे आणि तुमच्या पीएम किसान नोंदणीकृत मोबाईल नंबरच्या आधारे ॲप मध्ये लॉगिन करा व त्यानंतर तुम्ही लाभार्थ्याची माहिती असलेल्या पेजवर पोहोचाल.

3- मग तुमची ई केवायसी स्थिती येथे अपडेट केली नसल्यास ई केवायसी वर क्लिक करा आणि त्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाकावा.

हे केल्यानंतर एप्लीकेशनच्या माध्यमातून तुमचा चेहरा स्कॅन करण्याची परवानगी मागितली जाईल व त्यासाठी तुम्हाला तुमची संमती द्यावी लागेल. अशा पद्धतीने तुमच्या चेहऱ्याचे स्कॅनिंग सक्सेस झाल्यानंतर तुमचे केवायसी पूर्ण होते.

 ओटीपी आधारित केवायसी कशी करावी?

 या पद्धतीची ई केवायसी तुम्ही पीएम किसान पोर्टल आणि मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून करत करू शकतात. बायोमेट्रिक आधारित ई केवायसी शेतकरी सामायिक सेवा केंद्र आणि राज्य सेवा केंद्र याशिवाय प्रज्ञा केंद्रांना भेट देऊन करू शकतात.