संगमनेरातील ‘ त्या’ आगेत तब्बल 22कोटीचे नुकसान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :-संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असणाऱ्या वखार महामंडळाच्या गोडवूनला लागलेल्या आगीत 19 हजार कोटींच्या 13 हजार कापसाच्या गाठी तसेच गहू हरबरा सोयाबीन आणि काळी मिरी

आशा जवळजवळ10 हजार गोण्या  धान्य जाळून खाक झाले असून या आगीत  सुमारे 22कोटी रुपयांच्या आसपास नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज  वर्तविण्यात आला आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की मंगळवारी आज रात्री आठवाजे च्या सुमारास संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात एक ते दिडएकरच्या क्षेत्रात महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे गोडावून आहे

या गोडावून मध्ये सरकारने खरेदी केलेल्या कापसाच्या13हजार गाठी बाजरीच्या 50 व 30 किलोच्या 1300  गोण्या सोयाबीनच्या 50 किलोच्या  242 गोण्या  काळी मिरीच्या 250गोण्या गव्हा च्या 50 किलोच्या 200 गोण्या तरनाफेड हरबराच्या 50 किलोच्या 8हजार 823  आशा प्रकारे 10815 गोण्यअसे धन्य व कडधान्य साठवून ठेवले होते.

बाजार समितीच्या आवारातील धान्य साठवणून ठेवणाऱ्या  वखार महामंडळा च्या गोदामातील एका गोदामाला मंगळ वारी रात्री आठ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली.या आगीची माहिती समज ताच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सतिष गुंजाळ  हे तात्काळ घटनास्थळी हजर झाले गोडाऊन मधून निघणाऱ्या आगीच्या ज्वाला पाहून ते हबकून गेले

त्यांनी तात्काळ संगमनेर नगरपालिका सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखाना या दोन्ही अग्निशामक दलाला  पाचारण केले.  गेले मात्र गोडाउन मध्ये आग चांगलीच धुमसतहोतीत्यानंतरत्यांनी या गोदमाची देखरेख पाहणारे कनिष्ठ शाखा अधीक्षक कुलकर्णी यांना आगीची माहिती देत

गोडावूनची भिंत तोडल्यानंतरच अग्निशामक दलाला आग विझविता येईल असे सांगून कुलकर्णी यांनी सांगित ल्यानंतर परवानगी घेतली त्यानंतर जेसीबीच्या साह्याने दोन्ही बाजूने भिंत फोडत दहा ते वीस ठिकाणी ढोरे पाडले असता गोडावूनमधील कापसाच्या गाठीनी पेट घेतला. 

आग गोडाऊनमध्ये सर्वत्र पसरली यावेळी बाजार समितीच्या आवारात कोरोनाच्या नियमांकडे दुर्लक्ष करत लागलेली आग पाहण्यासाठी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. मात्र यागर्दीला हटविण्यासाठी पोलिसांच्या नाकी नऊ आले  होते. अखेर पोलिसांनी पोलीस बळाचा वापर करत अनेकांना काठीचा प्रसाददिला ल्यानंतर बघ्यांनी धूम ठोकत आपले घर गाठले त्यानंतर गर्दी कमी झाली.

आग लागल्याची माहिती मिळताच पुणे येथील वखार महामंडळाचे विभागीय महाव्यवस्थापक प्रशांत बारवे,प्रांतधिकारी डॉ शशिकांत मंगरुळे तहसीलदार अमोल निकम, निवासी नायबतहसी लदार सुभाष कदम ,पोलीस उपाधीक्षक राहुल मदने पो नि मुकुंद देशमुख, मुख्याधिकारी डॉसचिन बांगर ,आ.डॉ सुधीर तांबे नगराध्यक्षा दुर्गा ताई तांबे ,

बाजारसमितीचे सभापती शंकरराव खेमनर सर्व जण घटना स्थळी दाखल झाले त्यानंतर प्रांताधिकारी डॉ मंगरूळे यांनी तात्काळ सूत्रे हलवत संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखाना 2अकोले येथील अगस्तीसाखर कारखाना प्रवरानगर (लोणी)

येथील पद्म श्रीविठ्ठलराव विखे साखर कारखाना तसेच संगमनेर , अकोले ,श्रीरामपूर ,सिन्नर, शिर्डी राहता येथील नागरपालिका अशा विविध ठिकाणच्या10अग्निशमन दलाच्याबंबाना जवानां सह पाचारण करण्यातआलेहोते   एका मागे एक अशा वेगवेळ्या ठिकाणाहून10अग्निशामक बंब आवाज करत संगमनेरच्या दिशेने धावत आल्या आणि सर्वच बाजूने जोरात पाण्याचा मारा  केला.

त्यानंतर  काही अंशी आग आटोक्यात आली मात्र पूर्णतः आग  बुधवारी दुसऱ्याही दिवशी विझलेली नव्हती. वखार महामंडळाच्या गोडवूनलाआग कशाने लागली त्याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे परंतु गोडाऊन मध्ये लाईटच नसल्यामुळे लागलेली आग ही शॉर्ट सर्कि टमुळे लागली नसल्याचे प्रथमदर्शनी  दिसू न येत आहे.

जास्त उष्णतेमुळे फुमिंगेशन झाल्यामुळे हीआग लागली की अन्य कारणाने लागली याची माहिती पोलीस घेत आहे.  याबाबत पोलीस उपअधीक्षक राहुल मदने आणि पो नि मुकुंद देशमुख यांच्या आदेशांव्ये सहायक पोउपनिरक्षक राजेंद्र गायकवाड व पो ना संदीप बोठे यांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला .

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|