7th Pay Commission: नवरात्रीपूर्वीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार आनंदाची बातमी! DA Hike सह ‘या’ तीन मोठ्या घोषणा होणार…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7th Pay Commission : केंद्र सरकार (Central Govt) कर्मचाऱ्यांसाठी (employees) आनंदाची बातमी (Good news) देणार आहे. याची घोषणा नवरात्रीपूर्वीच (Navratri) होण्याची शक्यता आहे.

कारण माध्यमांमधील वृत्तानुसार सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) वाढ, थकबाकी आणि फिटमेंट फॅक्टर (Fitment Factor) संदर्भात मोठी घोषणा (Big announcement) होण्याची शक्यता आहे.

4 टक्के महागाई भत्त्यात वाढीची शक्यता

माध्यमांमधील माहितीनुसार केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ करण्याची शक्यता आहे. जुलैच्या अखेरपर्यंत महागाई भत्त्यातील वाढीबाबतचा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी शक्यता याआधी वर्तविण्यात आली होती.

मात्र आता नवरात्रीआधी म्हणजेच सप्टेंबर महिन्यात केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना खुशखबर देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्राकडून महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांना मिळणारा 34 टक्के महागाई भत्ता वाढून 38 टक्के इतका होईल. सरकारनं कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये यावर्षी मार्च महिन्यात वाढ केली होती.

मार्च महिन्यात 3 टक्के वाढ करण्यात आली होती आणि महागाई भत्ता 31 टक्क्यांवरुन 34 टक्के झाला होता. डीए हा कर्मचाऱ्यांच्या सॅलरी स्ट्रक्चरचाच भाग आहे.

सरकार महागाईचा दर पाहून डीए बाबतचा निर्णय घेत असतं. जेणेकरुन कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर याचा परिणाम होणार नाही. सरकारकडून महागाई भत्त्यात वाढ झाल्यास देशातील 50 लाख कर्मचाऱ्यांना आणि 65 लाख पेंशनधारकांना मोठा फायदा होणार आहे.

AICPI ची महत्वाची भूमिका

सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठीचा महागाई भत्ता निश्चित करण्यासाठी एआयसीपीआय इंडेक्स अत्यंत महत्वाचा ठरतो. जूनचा AICPI चा इंडेक्स 129.2 पॉइंटवर आला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 4 टक्के वाढ होईल अशी शक्यता आहे. फेब्रवारीनंतर AICPI इंडेक्समध्ये मोठी उसळी पाहायला मिळत आहे.

जानेवारी 2022 मध्ये इंडेक्सचा आकडा 125.1 इतकी होती. फेब्रुवारीत हा आकडा 125 आला होता. तर मार्चमध्ये पुन्हा वाढ होऊन 126 इतका झाला. एप्रिलमध्ये इंडेक्सचा आकडा वाढून 127.6 वर पोहोचला. पुढे इंडेक्समध्ये सातत्यानं वाढ होतच आहे. मे महिन्यात 129, तर जूनमध्ये 129.2 पॉइंटवर पोहोचला आहे.